नांदेड| मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुल आणि पुणे येथील फिल्म अॅन्ड टेलिव्हीजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया (FTII) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २५ ते ३० ऑक्टोबर दरम्यान एस.टी. प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी ‘चित्रपट रसास्वाद’ (Film Appreciation) अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा अभ्यासक्रम निशूल्क असुन, विद्यापीठातील मुख्य प्रशासकीय इमारतीतील अधिसभा सभागृमध्ये सकाळी १०:०० ते सायं ५:०० या वेळेत होणार आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फिल्म अॅन्ड टेलिव्हीजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया, पुणे (FTII) या संस्थेतील तज्ञ याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्कुल ऑफ फाइन अॅन्ड परफॅार्मींग आर्टस् ने यापुर्वी देखील एफ.टी.आय.आय. च्या सहकार्याने व विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उध्दव भोसले, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपट रसास्वाद, स्क्रिन अॅक्टींग, स्मार्ट फोन फिल्म मेकिंग व पटकथा लेखन आदी चित्रपट निर्मीती विषयक लघु अभ्यासक्रम व कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केले आहे. मराठवाड्यातील कलावंताना नाटक व चित्रपट निर्मीती विषयक प्रशिक्षण मिळविण्यासाठी पुर्वी पुणे-मुंबई सारख्या मोठ्या शहराकडे जावं लागत असे परंतु विद्यापीठ सातत्याने नाटक, चित्रपट आदी कलांच्या प्रशिक्षणाची संधी नांदेड शहरात उपलब्ध करुन देत आहे. अशी माहिती संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर यानी दिली.
चित्रपट रसास्वाद (Film Appreciation) या लघु अभ्यासक्रमाचा अनुसुचित जमाती (एस.टी.) प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केले आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना नाव नोंदणी करावी लागणार असुन, प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास प्राधान्य दिले जाणार आहे. नाव नोंदणीसाठी नाट्यशास्त्र विभागातील कार्यशाळा संयोजक प्रा. राहुल गायकवाड (मो. ९०४९०४३८९४) व प्रा.अभिजीत वाघमारे (मो. ७३५०३९८२७३) यांच्याशी संपर्क साधावा.