नांदेड| अनैतिक संबंधाच्या वादातून एकाने दुसऱ्याचा तिक्ष्ण हत्याराने गंभीर वार करून खुन केला खून केला होता. या प्रकरणी वजिराबाद येथे आरोपी मंदीपसिंग नानकसिंग काटघर विरूद्ध गुन्हा दाखल झाला होता. या घटनेचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर सरकार पक्षाचा पुरावा व उभय पक्षाचा युक्तीवाद ऐकुन मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री नागेश व्ही. न्हावकर, जिल्हा न्यायालय, नांदेड यांनी आरोपीस दोषी ठरवुन आजीवन सक्षम कारावास व १०,०००/- दंड व कलम २०१ अंतर्गत ३ वर्षे व ५०००/- दंड ई. गुन्हयाअंतर्गत आरोपीस शिक्षा सुनावली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, फिर्यादी लक्कीसिंग गणपतसिंग मिलवाले यांनी दिनांक २३.०८. २०१८ रोजी अशी फिर्याद दिली होती की, मागील दीड महिण्यापुर्वी मयत सुरजीतसिंग उर्फ कालु याचा रात्री १ च्या सुमारास मला फोन आला की, मला वाचवा मी आता कौर यांच्या घरी असुन, दरवाज्यावर मनदीपसिंग तलावर घेवुन उभा आहे. यावरून मी घरी गेलो तेथे तलवार घेवुन मनदीपसिंघ व माझा घराशेजारी राहणारा कालीया हे घरासमोर उभे होते. मनदीपसिंग कालु यास सांग की, कौर हिचा नाद सोडून दे नाहीतर मी दोघांनाही खतम करून टाकीन असे म्हणुन दोघेही तिथुन निघुन गेले..
दिनांक २३.०८.२०१८ रोजी रात्री २ वाजून १५ वाजताच्या सुमारास मी गुरूव्दारा गेट नं.१ वर ड्युटी करत असताना माझा चुलत भाउ सुरजीत सिंग उर्फ कालु याचा कनकया कंपाउड गुरूकृपा रसवंतीच्या समोर खुन झाला. असे समजताच मी तेथे येवुन पाहिले असता सुरजीतसिंग उर्फ कालु याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात होता. डोक्याच्या पाठीमागील बाजुस खुप मोठा घाव होता व त्यातून रक्त येत होते. मंदीपसिंग नानकसिंग काटघर रा. कुंभार गल्ली गुरुव्दारा गेट नं. १ याने कौर हिच्यासोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून सुरजीतसिंग उर्फ कालु पिता लहरसिंग मिलवाले वय २५ वर्षे रा. गुरूव्दारा गेट नं. ५ नांदेड याचा तिक्ष्ण हत्याराने गंभीर वार करून खुन केला. यावरून पो.स्टे. वजिराबाद येथे आरोपी मंदीपसिंग नानकसिंग काटघर विरूद्ध गुन्हा रजिस्टर नं. २३३ / २०१८ कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला. गुन्हयाचा तपास स.पो.नि. सुनिल बड़े यांनी करून मा.न्यायालयासमक्ष आरोपीविरूध्द दोषारोप पत्र दाखल केले. प्रकरणात सरकार पक्षाने एकुण १७ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. तसेच गुन्हयात तपास अधिका-याने जप्त केलेले सी. सी. टी. व्ही फुटेज पुराव्यात दाखविण्यात आले.
सरकार पक्षाचा पुरावा व उभय पक्षाचा युक्तीवाद ऐकुन मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री नागेश व्ही. न्हावकर, जिल्हा न्यायालय, नांदेड यांनी आरोपीस दोषी ठरवुन आरोपीस कलम ३०२ भा.दं.वि. अंतर्गत आजीवन सक्षम कारावास व १०,०००/- दंड व कलम २०१ अंतर्गत ३ वर्षे व ५०००/- दंड ई. गुन्हया अंतर्गत आरोपीस शिक्षा सुनावली सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील श्री रणजीत देशमुख यांनी काम पाहिले. सत्र न्यायालय कोर्ट पैरवी अधिकारी म्हणुन पो.हे.कॉ जितेंद्र तरटे यांनी काम पाहिले..