नांदेड। गेल्या 26 वर्षांपासून सातत्याने सुरु असलेल्या स्वर्गीय अॅड. बन्सीलाल काबरा व्याख्यानमालेचे रविवार दि. 8 ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.
येथील हॉटेल चंद्रलोक येथे रविवारी सकाळी 9.30 वाजता साहित्यिक प्रा डॉ जगदीश कदम यांचे हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन होणार असून जिएस्टीपीएम मुंबईचे अध्यक्ष अॅड प्रवीण शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत.
या व्याख्यानमालेत मुंबई येथील प्रख्यात कर सल्लागार सीए. आशित शाह व संभाजीनगर येथील सीए अॅड शुभम राठी व नांदेड येथील सीए पवन मूंदड़ा यांची अनुक्रमे ‘जीएसटी मध्ये सर्वे,सर्च, सीजर तसेच आयकर कायद्यात फेसलेस असेसमेंट, अपीलचे नियम, तसेच लघु उद्योग, त्यावर लोन, सब्सिडी या विषयावर व्याख्याने होणार आहेत.तर नांदेड़ येथील जेष्ठ चार्टर्ड अकाऊंटंट सीए हर्षदभाई शहा परभणी येथील कर सल्लागार जगदिशजी मूंदड़ा यांचा सम्मान तर डिप्लोमा इन टैक्सेशन लॉ मधील प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे.
या व्याख्यानमालेस उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक अॅड. सी.बी.दागडीया तसेच संयोजन समितीचे सदस्य अॅड. जयप्रकाश काबरा, सीए प्रवीण पाटील, गंगाबिशन कांकर, सीए विजय मालपाणी, ओमप्रकाश पोकर्णा, वसंत मैय्या, सीए जयप्रकाश फलोर, अलीभाई पंजवानी, शंभूभाई भानुशाली,सीए. पी.एच.गट्टाणी, सीए गोविंद मुंदडा, सीए हर्षद शहा, रामचंद्र रंगनानी, कृष्णा शेवडीकर, कमल कोठारी, सीए मनोहर आयलाने, अॅड. अनील जोशी, स. रविंद्रसिंघ मोदी यांनी केले आहे.