नांदेडसोशल वर्क

मराठा कुणबी महासंघाकडून कामारी येथील देवराये कुटूंबीयाचे सांत्वन……. अर्थिक मदतीचा हात

हिमायतनगर, दत्ता शिराणे। तालुक्यातील कामारी येथील मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या सुदर्शन ज्ञानेश्वर देवराये यांच्या कुटूंबीयाची मराठा कुणबी महासंघाकडून ११ हजार रूपयांची अर्थिक मदत करूण देवराये कुटूंबीयाचे सांत्वन करण्यात आले.

ता २३ सप्टेंबर शनिवार ला मराठा कुणबी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश जाधव यांनी कामारी येथील देवराये कुटूंबीयाची सांत्वन पर भेट घेऊन ११ हजार रूपयांची मदत केली. व तसेच मनोज जरांगे पाटील, दत्ता पाटील हडसनीकर यांनी मराठा आरक्षणासंदर्भात चालविलेल्या उपोषण व चळवळीला त्यांनी पाठींबा दर्शविला. कामारी व सरसम येथे चालू असलेल्या साखळी उपोषणाला भेट देऊन मराठा समाजाच्या लढ्याला पाठींबा दिला आहे.

यावेळी मराठा महासंघाचे कोषाध्यक्ष संजय कदम, जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार, व्यंकटराव जाधव, हिमायतनगर तालुका डाॅक्टर असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. राजेंद्र वानखेडे, काँग्रेस चे तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी, यशवंत अबाळे आदिंची प्रामूख्याने उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!