नांदेड/हिमायतनगर। जिल्ह्यातील हिमायतनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते अभिषेक लूटे यांनी नुकतीच मुंबईत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्र्यां सोबत झालेल्या चर्चेअंती लूटे यांच्या अजित दादा यांच्या सोबत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अभिषेक लुटे हे सन २००२ पासून राष्ट्र वादी काँग्रेस सोबत जोडलेले आहेत. पक्षात राहून त्यांनी अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे. २००९ ला राष्ट्र वादी पक्षाचे युवक तालूका अध्यक्ष म्हणून काम पाहीले आहे. पंचायत समिती निवडणुक लढविली. त्या नंतर २०१५ ला नगरपंचायत निवडणुकीत त्यांचा निसटता अवघ्या १२ मतांनी पराभव झाला. राष्ट्र वादी पक्षाचे गेली अनेक वर्षांपासून निष्ठेने काम केलेले अभिषेक लूटे हे अजित दादाच्या संपर्कात असून लवकरच ते उपमुख्य मंत्री अजित दादा च्या गटात सामील होणार असल्याचे अभिषेक लूटे यांनी सांगीतले.