सकल मराठा समाजातर्फे मराठा महिलांचे 29 पासून साखळी उपोषण
नांदेड। मराठा समाजाला सरसगट कुणबी दाखले देऊन ओबीसी प्रवर्गात समावेश करावा या मुख्य मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करीत होते . सरकारच्या मन धरणीनंतर सतराव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आमरण उपोषण सोडून त्या ठिकाणी संबंध महाराष्ट्रामध्ये साखळी उपोषण करण्यात यावे असे आवाहन केले होते .
गाव पातळीवर सुद्धा या आवाहनाला मोठा प्रतिसाद देत सर्वसामान्य मराठ्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी साखळी उपोषणास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर नांदेड येथे दिनांक 29 सप्टेंबर ते 13 ऑक्टोंबर साखळी उपोषणास बसण्याचा निर्धार समस्त मराठा महिला भगिनीनी केला आहे.
सदरील हे साखळी उपोषण अतिशय लोकशाही मार्गाने करण्यात येणार असुन मराठा समाजाच्या न्यायिक मागण्या शासन दरबारी पोहचण्यासाठी उचललेलं हे संविधानिक पाऊल मराठा आरक्षणाच्या दृष्टीने अतिशय मोलाचे ठरणार असुन राज्य सरकार ने केलेल्या विनंती ला मान देऊन मराठा समाजाच्या सर्वच आंदोलकांनी शासनास सरसकट कुणबी दाखले देण्यासाठी चाळीस दिवसाचा कालावधी दिला असुन, या दरम्यान राज्यभर संविधानिक पद्धतीने आंदोलन चालुच राहणार आहेत,त्याचाच एक भाग म्हणुन नांदेड येथे समस्त सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा भगिनी साखळी उपोषण करण्यात येणार आहे.