एक गाव एक गणपती संकल्पना तालुक्यातील १८ गावात – पोलीस निरीक्षक बी. डी. भुसनूर यांची माहिती
तसेच हिमायतनगर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातून ९१ गणेश मंडळाची स्थापना झाली आहे. आमच्याकडे परवान्यासाठी अनेकांनी अर्ज सादर केले आहेत. त्यापैकी १८ गावात एक गाव एक गणपती तर इतर गावात ४५ अशी एकूण ६३ गणेशाची ग्रामीण भागात स्थापना झाली आहे. तसेच हिमायतनगर सारख्या एकट्या शहरात जवळपास २८ ठिकाणी मुर्त्या स्थापन करण्यात आल्या आहेत. अशी माहिती डीएसबीचे अविनाश श्यामसुंदर कुलकर्णी यांनी दिली.
गणेशोत्सवाच्या पार्शवभूमीवर शांतता व सुव्यवस्थेत गणेशोत्सव पार पडावा म्हणून पोलिस निरीक्षक बी.डी.भुसनूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी, पोलीस उपनिरीक्षक स्मिता दिलीप जाधव, ३८ पोलीस कर्मचारी, २५ होमगार्ड, १० पोलीस व ५ महिला पोलीस नवप्रशिक्षणार्थी, आदी ८२ हून अधिक पोलिसांचे शहरातील मुख्य रस्त्यावरून पथसंचालन (रूट मार्च) करण्यात आले. आत्ता पर्यंत गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासून ७ व्या दिवशी ९ गणेश मंडळाचे विसर्जन होत आहे, नवव्या दिवशी १४ आणि शेवटच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीला उर्वरित गणपतीचे विसर्जन होणार आहे. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यात “एक गाव एक गणपती” हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण ३३ पोलीस ठाण्याअंतर्गत ६५८ गावांनी एकत्र येत ‘एक गावएक गणपती’ बसविले आहेत. किनवट ५०, माहूर ४०, इस्लापूर ३७, मुखेड३३, कंधार ३३, सिंदखेड २९, देगलूर २९, कुंटूर २७, उस्माननगर २६, माळाकोळी २५, नायगाव २२, हदगाव, धर्माबाद, रामतीर्थ व लोहा येथे प्रत्येकी २१, अर्धापूर, बिलोली, उमरी प्रत्येकी २०, हिमायतनगर १८, सोनखेड १७, मांडवी १६, कुंडलवाडी, लिंबगाव प्रत्येकी १५, मुक्रमाबाद १३, भोकर, मनाठा प्रत्येकी १२, मरखेल १०, मुदखेड ५, नांदेड ग्रामीण ५, भाग्यनगर व विमानतळ ठाणे अंतर्गत प्रत्येकी एक, तामसा २, अर्धापूर २० अशा एकूण ३३ पोलीस ठाण्या अंतर्गत एक गाव एक गणपतीस्थापन करण्यात आला आहे.