हिमायतनगर, अनिल मादसवार| आगामी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याला अवघ्या काही दिवसाचा अवधी शिल्लक असतानाच हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात राजकीय उलथापालथीला मोठा वेग आला आहे. काँग्रेस पार्टी महाविकास आघाडीकडून इच्छुक आणि उमेदवारी मिळण्याच्या आघाडीवर असलेल्या डाॅ. रेखाताई चव्हाण यांनी हदगाव हिमायतनगर तालुक्यातील नेते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर पाटील चाभरेकर यांची भेट घेऊन चर्चा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक महिन्यांपासून डाॅ. रेखाताई चव्हाण काम करीत आहेत. गावभेटीवर त्यांचा जास्त भर असून, ठिक ठिकाणी जावून तेथील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या त्या जाणून घेत आहेत. त्यांच्या या जनसंवाद फेरीला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यन्त त्यांनी विधानसभा मतदार अनाघातील २०० हुन अधिक गावांना भेट देऊन आपला जनसंवाद दौरा यशस्वी केला आहे. त्यांच्या या जनसंवाद दौऱ्याची आणि त्यांनी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राबविलेल्या विविध उपक्रमाची आणि गोर गरिबांसह शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्यासाठी त्यांनी चालविलेल्या धाडपडीची जिकडे तिकडे जोरदार चर्चा होत असून, त्यांना उमेदवारी नक्कीच मिळेल असा ठाम विश्वास त्याचे समर्थकांनी व्यक्त केला आहे.
सध्या नवरात्र महोत्सव चालू असून, स्त्री शक्तीचा जागर कार्यक्रमादरम्यान त्यांनी हदगाव हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावास भेटी देऊन नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काळ सायंकाळी त्यांनी हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपूर गावात भेट दिली. यावेळी तेथील महिलांनी त्यांना आरतीचा मान देऊन गौरव करीत एक चांगल्या प्रकारचा संदेश दिला आहे. या दोन तिन महिन्याच्या कालावधीत त्यांनी हदगाव हिमायतनगर मतदारसंघ अगदी पिंजून काढला आहे. नुकतीच डाॅ. रेखाताई चव्हाण यांनी हदगाव हिमायतनगर तालुक्यातील नेते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर पाटील चाभरेकर यांची भेट घेऊन चर्चा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाविकास आघाडीकडून त्या प्रबळ दावेदार म्हणून सध्यातरी पुढे असून, माताराणीच्या कृपेने माझ्या नावाला नक्कीच बिरफॉर्म लागेल असा ठाम विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे.