हिमायतनगर,अनिल मादसवार| सध्या दिवाळीची धामधूम सुरु होण्यास अवघा दिवसाचा वेळ शिल्लक आहे. त्यामुळे हिमायतनगर येथील भारतीय स्टेट बैंकेत मोठ्या प्रमाणात नागरिक व खातेदार महिला – पुरुषांची गर्दी झाली आहे. याचं संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने हिम्यातनगर शहरातील SBI बैंकेच्या खात्यातून काढलेली ९० हजारांची रक्कम अज्ञात चोरट्याने लांबविली आहे. हि घटना बुधवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली असून, पोलिस निरीक्षक बी. डी. भुसनूर यानी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी करून चोरट्याला पकडण्यासाठी पोलीस तपास सुरु केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर शहरात दीपावलीच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजारात तोबा गर्दी झाली. बाजार आणि दिवाळीची खरेदी करण्यासाठी शहरातील बैंकेत शहर व ग्रामीण भागातील महिला – पुरुष नागरिक दाखल झाले आहेत. अश्याच काहीतरी कामासाठी तालुक्यातील मौजे सोनारी येथील जिल्हा परिषद शेळीचे मुख्याध्यापक श्री साहेबराव देशमुख हे हिमायतनगर शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या भारतीय स्टेट बैंकेच्या शाखेत दुपारी १२ वाजता आले होते. सुरुवातील बैंकेत आल्यानंतर त्यांनी कैसे काउंटरवरून खात्यातील हजार आणि त्यानंतर हजारांची रक्कम काढली. आणि रक्कम पाठीवरील बैगेत ठेऊन ते बैंकेबाहेर पडत होते. दरम्यान त्यांच्यावर सुरुवातीपासून नजार ठेऊन आसलेल्या अज्ञात दोघांनी बैंकेतुन रक्कम काढताना देखील मुख्याध्यापक यांनी बैन्केतील आसनावर ठेवलेल्या बैगेत हिरव्या रंगाच्या वायरच्या थाळीच्या आड हात घालून बाईक चेक केली. मात्र त्यावेळी त्यांना काहीच सापडले नाही.
जेंव्हा मुख्यह्दयंपाक यांनी रक्कम काढून बैगेत ठेऊन परत बैंकेबाहेर पडत असताना खात्यातून काडलेली ९० हजारांची रक्कम मुख्याध्यापक देशमुख यांच्या पाठीमागे येत असताना पुन्हा हिरवी थैली आड करून बैगेची चैन काढून अवघ्या ३ ते ५ सेकंदात लांबविली. दरम्यान बाहेर येताच त्यांना काहीतरी जानवंल्याने त्यांनी बैग पहिली असता त्यातील रक्कम चोरीला गेली असल्याचे निदर्शनं आले आहे. लागलीच मुख्याध्यापक देशमुख यांनी बैंकेचे शाखाधिकारी श्री अमेय बर्वे आणि पोळी निरीक्षक बी. डी.भुसनूर यांच्याशी संपर्क साधून तक्रार दिली. त्यांनी लागलीच आपला ताफा घेऊन भारतीय स्टेट बैन्केतील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता त्या अज्ञात चोरटयांनी मुख्याध्यापक साहेबराव देशमुख यांच्या पाठीवरील बैगेतून रक्कम चोरली असल्याचे दिसून आले आहे. हिमायतनगर पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.