राजश्री पब्लिक स्कुलमध्ये आषाढी एकादशी निमित्त चिमुकल्यांची वारकरी दिंडी
नवीन नांदेडl आषाढी एकादशी निमित्ताने राजश्री पब्लिक स्कूल लातूर फाटा नांदेड येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विठ्ठल रूक्मिणीची वेशभूषा साकारण्यात आली, तर अनेक विद्यार्थी वारकरी वेशभूषेमध्ये आले होते. शाळा परिसरात पायी दिंडी काढण्यात आली.
संस्थेचे सचिव दिलीप पाटील ,संचालिका डॉ.सौ. कल्पना पाटील,व्यवस्थापक सुशांत पाटील, इंजि.अनुराग पाटील,सौ.आश्विनी पाटील, मुख्याध्यापक माऊली मुंढे, सौ.धनश्री तोरणेकर आदी मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीचे पूजन करण्यात आले ,शाळेच्या सभोवतालच्या परिसरात विद्यार्थ्यांची पायी वारकरी दिंडी काढण्यात आली. शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी हे वारकरी वेशभूषेत आले होते. हरीनामाच्या भक्ती गीताने,नामदेव तुकारामांच्या जयघोषात, टाळ मृदंगाच्या नादात शाळेच्या सभोवतालचा परिसर दुमदुमून गेला होता.
प्रसंगी शाळेच्या परिसरातील नागरिकांच्या वतीने दिंडीचे पूजन करण्यात आले,नंतर शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांनी भक्तीगीतांवर वारकरी पाऊल,फुगडी तसेच पारंपारिक नृत्याचे सादरी करण केले. यावेळी शाळेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.