करियरनांदेड

बारावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता संकेतस्थळावर उपलब्ध

नांदेड। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उद्या मंगळवार 21 मे 2024 रोजी दुपारी 1 वा. ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.

mahresult.nic.in,http://hscresult.mkcl.org,www.mahahsscboard.in,https://results.digilocker.gov.inwww.tv9marathi.comhttp://results.targetpublications.org परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. सदर माहितीचे प्रिंट आऊट घेता येईल. त्याचप्रमाणे डीजीलॉकर ॲपमध्ये डिजीटल गुणपत्रिका संग्रहीत करुन ठेवण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. www.mahresult.nic.in  या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

निकालाबाबत अन्य तपशील

ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांस स्वत: च्या अनिवार्य विषयापैकी (श्रेणी विषयाव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांची छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर http://verification.mh-hsc.ac.in स्वत: किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक अटी/शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रत साठी बुधवार 22 मे 2024 ते बुधवार 5 जून 2024 पर्यत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येतील. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क डेबिट कार्ड/क्रेडीट कार्ड, यूपीआय, नेट बँकिंग याद्वारे भरता येतील.

फेब्रुवारी-मार्च 2024 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसात पुनर्मूल्याकंनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

फेब्रुवारी मार्च 2024 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षेत सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोन संधी जुलै-ऑगस्ट 2024 व फेब्रुवारी- मार्च 2025 श्रेणी/गुणसुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहील.

जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनपरिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यासाठी सोमवार 27 मे 2024 पासून मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहे. याबाबत स्वतंत्रपणे परिपत्रक निर्गमित करण्यात येणार असल्याचे मंडळाच्यावतीने कळविले आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!