
नवीन नांदेड। नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या प्रभाग क्रमांक १९ व २० मधील जवळपास २० नालेसफाईचे काम जेसीबी, पोकॉलाईन व मनुष्य बळाच्या सहाय्याने स्वच्छता निरीक्षक यांच्या अहवाला नुसार हे काम करण्यात येत आहे. दरवर्षी पावसाळ्याचे पाणी सखल भागात साचून अंतर्गत रस्ते व मुख्य रस्त्यावर मोठा प्रमाणात पाणी तुंबत होते. यावर्षी मनपा आयुक्त डॉ, महेश कुमार डोईफोडे यांच्या आदेशानुसार स्वच्छता विभाग सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम चालू करण्यात आली आहे.
दरवर्षी पावसाळ्यात मोठया प्रमाणात नाल्या तुंबत असल्याने सखल वस्ती व अंतर्गत रस्ते व परिसरातील अनेक भागातील मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी होत असल्याने अनेक भागातील नागरीकांना या समस्या तोड दयावे लागत असत, गेल्या काही दिवसांपूर्वी अचानक झालेल्या पावसाचे पाण्याने अनेक भागातील नाले तुंबून पाणी व कचरा मुख्य व अंतर्गत रस्त्यावर पसरला होता, या पार्श्वभूमीवर परिसरातील अनेक नागरीकांनी व सामाजिक कार्यकर्ते आजी माजी लोकप्रतिनिधी यांनी क्षेत्रीय कार्यालय यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.
तक्रारी नोंद घेऊन सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड, कार्यालय अधिक्षक विलास गजभारे,यांनी परिसरातील नाल्याच्या प्रत्यक्ष घटनास्थळ पाहुन स्वच्छता निरीक्षक किशन वाघमारे,अर्जुन बागडी यांना आदेशीत केले होते. त्यानुसार प्रभाग क्रमांक १९ मधील ८ व २० मधील ११ नाल्याच्या अहवाल सादर केल्या नंतर मनपा आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, स्वच्छता विभाग सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक,विभाग प्रमुख वसिम तडवी यांच्या कडे अहवाल दिल्या नंतर नाल्याच्या साफ सफाईला सुरूवात करण्यात आली.
यात प्रभाग क्रमांक १९ मध्ये आठ नाले पोकलेन व्दारे,जेसीबी,व मनुष्य बळाच्या सहाय्याने तर प्रभाग २० मध्ये ही जवळपास ११ नाले साफसफाई मोहीम चालू करण्यात आली आहे, या मोहिमे मुळे ऐन पावसाळ् यात होणारी पावसाच्या पाण्यातून कोडीतुंन अनेक भागातील समस्या सुटणार आहे.
