नांदेड। ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या दुध डेअरी भागात ४ मे २२ रोजी जुना बॅकेट कारखाना जवळ शेख फारूक यांच्या नऊ जणांनी गैर कायदा मंडळी जमवून खंजर व दगडाने मारून खुन केला होता या पैकी तीन जणांना अटक केली होतील यातील दोन जणांना हिमंतपुर परिसरातून १५ मे रोजी दुपारी गुन्हे शोधपथकाने अटक केली आहे.
या प्रकरणी पोलीस सुत्रांनी २६८/२२ कलम ३०२, ३०७,१४३, १४७, १४८,भादवी नुसार ४ २५/०७,भारतीय हत्यार कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता, यातील नऊ आरोपी पैकी तीन जणांना अटक केली होती तर यातील गेल्या दोन वर्षापासून फरार असलेल्या शेख बशीर राजे साहेब,व शेख सलमान बशीर या दोघांना मिळालेल्या गोपनिय माहिती वरून ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या हिमंतपुर येथुन १५ मे रोजी दुपारी पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक महेश कोरे, पोहेकॉ विक्रम वाकडे, प्रभाकर मलदोडे, शेख सतार, पोकॉ माधव माने,पालेपवाड यांनी गोपनिय महीती आधारे आज दुपारी ताब्यात घेतले असून उर्वरित तीन आरोपीचा शोध घेत आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार,पोलीस उपविभागीय अधिकारी सुशिल कुमार नायक यांनी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करत आहेत.