नांदेड| लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजच्या शेवटच्या दिवशी ७२ अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत एकूण ९२ अर्ज दाखल झाले असल्याची जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी माहिती दिली आहे.
अर्जाची छाननी ५ एप्रिलला होईल. दुपारी 11 वाजेनंतर छाननीच्या कामास सुरूवात होणार आहे. त्यामुळे उद्या दुपारपर्यंत ९२ अर्जापैकी किती अर्ज रद्य झाले हे कळेल. उमेदवारांना अर्ज ८ एप्रिल पर्यंत मागे घेता येईल. ८ तारखेला अंतिम उमेदवार निश्चित होईल.
नामनिर्देशन कक्षाकडून उमेदवारांना मदत
नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी दाखल झाले. अर्ज दाखल करताना उमेदवारांना प्रतिनिधींना मोठ्या प्रमाणात विविध बाबींच्या माहितीची गरज असते. नामानिर्देशन कक्षाकडून उमेदवारांना मोठया प्रमाणात मदत झाली. सहाय्यक निवडणूक अधिकारी विकास माने यांच्या नेतृत्वात हा कक्ष कार्यरत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नामनिर्देशन सहाय्यता कक्षामध्ये शेवटच्या दिवशी 72 उमेदवारांना सहायता करण्यात आली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून हा कक्ष सुरू करण्यात आला होता. या कक्षाच्या माध्यमातून सर्व उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करताना विशेष सहाय्य केले गेले.