नांदेड| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातून विदर्भातील गोवंश तस्करांकडून निर्दयीपणे वाहनात कोंबून तस्करी करताना हिमायतनगर पोलिसांनी दोन वाहने रंगेहात पकडली आहे. या दोन वाहनात एकूण 23 गोवंश आणि बोलारो वाहने अशी मिळून एकूण 12 लक्ष 30 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन कार्यवाही केली आहे. मागील महिन्यात अश्याच प्रकारची मोठी कार्यवाही भरदिवसा हिमायतनगर तालुक्यात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे झाली होती. त्यावेळी दोन ट्रक आणि गोवंश असा मोठा साथ पकडण्यात आला होता. त्यानंतर काळाची हि दुसरी कार्यवाही झाल्यामुळे गोवंशाची तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या कार्यवाहीसाठी तात्काळ पोलिसांनी धाव घेतल्यामुळे विश्व् हिंदू परिषद देवगिरी प्रनतचे गोरक्षण विभागाचे नांदेड जिल्हा प्रमुख किरण बिचेवार यांनी पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेबद्दल आभार मानले आहे.
दि.23/03/2024 रोजी हिमायतनगर पोलीस रात्रगस्त करीत असताना गोपनीय बातमीदार मार्फत दोन वाहनातुन पळसपुर रोडणे अवैद्य जनावरांची वाहतुक होत असल्याची माहिती मिळाली होती. यावरून हिमायतनगर पोलिसांनी पळसपुर टी पॉईंट येथे जाऊन मध्यरात्रीला 03.30 ते 03.45 वाजण्याचे सुमारास वाहन क्र.1) MH 26 BE 7033 व 2) MH 42 AQ 61.28 आले असताना पोलिसांनी थांबवून विचारपुस केली असता अगोदर वाहनचालकाने उडवाउविचे उत्तर दिली. संशय आल्याने पोलिसांनी वाहनाची पाहणी केली असता वाहनातून गोवंश नेले जात असल्याचे आढळून आले.
त्या बोलेरो पिकअप वहाणामध्ये लाला पांढरा रंगाचा शेपुट गोंडा काळा वय 2 वर्ष, 2) एक पंधरा रंगाचा शेपुट काळा गोंडा वय 2 वर्षे, 3) एक जांभळा रंगाचा शेपुट काळा गोंदा वय वर्षे, 4) एक लाला रंगाचा पांढरा साधा से वय वर्षे, 5) एक लाला रंगाचा शेपुट गोंडा काळा वय वर्षे एकसारख्या रंगाचा शेपुट गौडा शेपुट गोंडा लाल वय खेजा का पांढरा साचा शेपुट गोंडा काळा वय उवर्षे, 8) एक काळा पांढऱ्या रंगाचा शेपुड गोंजा काळा वय उवर्षे, 9) एक कृष्णा रंगाचा शेपुट गोंडा काळा वय वर्षे, 10) एक लाल रंगाचा शेपुट गोंडा काळा वय आपका यय को हरिया रणाचा शेपुट गोंडा काळा यय 2 वर्षे, 12) एक पाढऱ्या रंगाचा शेपुट गोंडा काळा वय 2 वर्षे असे प्रत्येकी किमंती 10,000/- व बोलोरो वाहणाची किमंत 500,000/- असा एकूण 5 लक्ष 10 हजारांचा मुद्देमाल आढळून आला होता.
तर दुसरा बोलोरो वाहन क्र. MH 42 AQ 6128 मध्ये 1) लाल रंगाचा शेपुट गोंडा काळा वय 2 वर्षे, 2) एक जांभळ्या रंगाचा शेपुट गौडा काळा वय 2वर्ष, 3) एक जांभळ्या रंगाचा शेपुट गोंडा काळा वय 2 वर्षे, 4) एक कृष्णा रंगाचा शेपुट गाँडा काळा वय उवर्षे. 5) एक पांढ़न्या काळा रंगाचा शेपुट गोंडा काळा वय 2 वर्षे, 6) एक लाल रंगांचा शेपुट गोंडा काळा यय 1 वर्षे, 7) एक पांढऱ्या रंगाचा शेपुट गोंडा काळा वय उवर्षे, 8) एक कोस रंगाचा शेपुट गोंडा काळा वय 2 वर्षे, 9) एक हारण्या रंगाचा शेपुट गोंडा काळा वय 2 वर्षे, 10) एक लाल रंगाचा शेपुट गोंडा काळा वय उथर्षे, 11) एक गिरलाल रंगाचा शेपुट गोंडा काळा वय उवर्षे प्रत्यकी गोवंश (जनावरे) किंमती अंदाजे 10,000/- व प्रत्येकी बोलोरो वाहणाची किमंत 500,000/- असे एकुन 23 जनावरे (गोवंश) किमंती 2,30,000 व दोन बोलोरो वाहन किंमती 10,00,000 किमंती अंदाजे यामध्ये अवैध्य रित्या वाहनामध्ये निर्दय कोंबुन घेवुन जात असताना गोवंश व वाहन असे एकुन किमंती 12,30.000/-मिळुन आला.
यावरून हिमायतनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी श्यामसुंदर गंगाधर नागरगोजे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून 1) शेख निसार शेक इसाक वय 45 वर्षे व्यवसाय व्यापार रा. जिनींग प्रेस जवळ हदगाव जि. नांदेड, 2) अ. समद पि.अ. वहाब वय 42 वर्षे रा. संत गजानन वार्ड उमरखेड जि. यवतमाळ, बोलोरो वाहन चालक व मालक 1) शेख शाकेर शेक रशीद वय 35 वर्षे व्यवसाय खाजगी ड्रायव्हर रा. ताजपुरा ता. उमरखेड जि. यवतमाळ, 2) शेख शेरू शेख दस्तगीर वय 35 वर्षे व्यवसाय चालक रा. हस्तरा ता. हदगाव जि. नांदेड, 3) स. समीर स. गफार वय 24 वर्षे व्यवसाय क्लीनर रा. रामरहिम नगर उमरखेड जि. यवतमाळ यांचे विरुध्द यांचे विरुद्ध कलम 13,11(1) (ड) (ई) (फ) प्राण्यांना निर्दयपणे वागवीण्यास प्रतिबंध कायदा 1960 प्रमाणे व प्राणी संरक्षण अधिनियम कलम5 (a),5(b) सह कलम 47 (अ), 48,50,56 (c) प्राण्यांचे वाहतुक नियम 1978 सह कलम 125 E MV act प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड जिल्हा तेलंगाना राज्यास लागून असल्याकारणाने नांदेड जिल्ह्यामधून कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात मोठ्या प्रमाणावर वंशाची तस्करी केली जात आहे. पोलीस प्रशासनाने गोहत्ये विरुद्ध आणि गोवंशाची तस्करी होत करणाऱ्या तस्करांविरुद्ध कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे सांगितले. माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत काटेकोर पालन केले तर एकाही कसायाची हिंमत नाही ते गोवंशाची कत्तल किंवा कत्तलीसाठी वाहतूक करू शकतील. तसेच नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे गोवंश त्यांच्या आखाड्यावरून चोरून नेण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे तशा केसेस सुद्धा विविध पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणावर दाखल झालेले आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या कसा यांचे रॅकेट शोधून उध्वस्त केले पाहिजे आणि नांदेड जिल्ह्यात चालू असलेले अवैध कत्तलखाने जमीनदोस्त केले पाहिजे. अशी प्रतिक्रिया किरण सुभाष बिच्चेवार, नांदेड विभाग गोरक्षा प्रमुख, विश्व हिंदु परिषद देवगीरी प्रांत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.