नांदेडमहाराष्ट्र

विश्व हिंदु परिषद, बजरंग दलावर केलेले कसायांचे सर्व आरोप खोटे आहेत- किरण बिच्चेवार

नांदेड । दि १६ मार्च २०२४ रोजी नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत केलेल्या कारवाईच्या अनुषंगाने एका ऑनलाईन न्यूज चॅनलने केलेले वार्तांकन हे साफ खोटे आहे. कारण विश्व हिंदू परिषद, बजरंग दल किंवा गोरक्षा विभागाचे गोरक्षक कार्यकर्ते 112 वरच काॅल करून किंवा वरीष्ठ पोलीस अधिकारी यांना माहिती देऊनच कत्तलीसाठी वाहतुक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाते. जुलै २०२३ पासून आमच्या संघटनेचा कोणताही कार्यकर्ता रोडवर उतरून कसायांचे वाहन अडवत नाही. म्हणून कत्तलीसाठी जाणाऱ्या गाड्यांचे बजरंग दलाचे कार्यकर्ते पैसे घेतात असा आरोप करणे हे धादांत खोटे आहे. या विरोधात आम्ही लवकरच मानहानी दावा कोर्टामध्ये दाखल करणार आहोत.

पुढे बोलतांना बिच्चेवार म्हणाले महाराष्ट्र राज्यामध्ये ” प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ ” अस्तित्वात आहे. त्या कायद्याच्या अंतर्गत संपुर्ण गोवंश आणि दुधासाठी, पैदाशीसाठी, ओझी वाहण्याच्या कामासाठी किंवा शेतीविषयक प्रयोजनांसाठी उपयुक्त असलेल्या इतर कोणत्याही प्राण्याची कत्तल करता येत नाही. म्हणूनच नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत झालेली कारवाई योग्य कारवाई आहे. फेब्रुवारी २०२४ मध्येच नांदेड जिल्ह्यातील माननीय उमरी न्यायालयाने कत्तलीसाठी जाणाऱ्या म्हशींच्याच प्रकरणांमध्ये ४ आदेश पारित केलेले आहेत. त्यामध्ये प्राणी संरक्षण अधिनियम १९९५(सुधारीत) अंतर्गत कारवाई केलेली होती. माननीय न्यायालयाने पोलीस स्टेशन उमरी यांनी केलेली कारवाई योग्य ठरवून कसायांचे चारही अर्ज रद्दबातल केले आहेत.

तसेच काल प्रसिद्ध केलेल्या न्यूज चैनल वरील वृत्तामध्ये उमरी केस मधील जनावरं हिमायतनगरच्या गोशाळेमध्ये ठेवले होते आणि त्यांनी ते परस्पर विकलेत असा देखील खोटा आरोप करण्यात आलेला होता वास्तविक पाहता ते सर्वच्या सर्व म्हशी आज देखील गोशाळेमध्ये सुस्थितीत असून त्यांचं ऑनलाइन टॅगिंग देखील केलेले आहे. संबंधित प्रतिनिधींनी या बाबीची शहानिशा न करता अशा खोट्या बातम्यांचे वृत्तांकन करून समाजात गैरसमज निर्माण करणे चुकीचे आहे. त्यामुळे या वृत्तांकनास जे जे दोषी आहेत त्यांच्याविरुद्ध आम्ही मानहानीचा दावा दाखल करणार आहोत, असे किरण बिच्चेवार म्हणाले.

तसेच संबंधित प्रतिनिधीने काही डमी शेतकऱ्यांच्या मुलाखत घेऊन आमचे कार्यकर्ते शेतकऱ्यांचे वाहन अडवुन त्यांच्याकडुन पैसे घेतात असे खोटे आरोप केलेले आहेत. आमचा एकही कार्यकर्ता कोणत्याही शेतकऱ्यांच्या जनावरांचा वाहन अडवत नाही. कारण आम्हाला चांगल्या प्रकारे खात्री आहे कोण शेतकरी आहेत आणि कोण कसाई आहेत. आज पर्यंत नांदेड जिल्ह्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी एकही गुन्हा शेतकऱ्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला नाही, तसे असते तर प्रत्येक बाजाराच्या दिवशी १५ ते २० वाहनांवर गुन्हे दाखल झाले असते. त्यामुळे संबंधित प्रतिनिधीने जाणीवपुर्वक आमच्या संघटनेची बदनामी करून खच्चीकरण करण्याच्या उद्देशाने हे वार्तांकन केलेलं आहे, असे बिच्चेवार म्हणाले.

याद्वारे माझे नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन आहे, आपण देखील कसायांना कोणत्याही प्रकारची मदत करू नये तसे केल्यास, कत्तलीसाठी जनावरं पुरवने, कत्तलीसाठी वाहतुकीस मदत करणे हे देखील गुन्हा आहे. नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कसायांनी दलालांच जाळं विणलेले असुन पोलीस प्रशासनाची दिशाभुल करण्याचा प्रयत्न कसायांकडुन सातत्याने सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाने अत्यंत जागरूक राहुन पारदर्शकपणे कारवाई करावी अशी विनंती किरण सुभाष बिच्चेवार, नांदेड विभाग गोरक्षा प्रमुख, विश्व हिंदु परिषद देवगीरी प्रांत यांनी प्रशासकीय यंत्रणेला केली आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!