![](https://newsflash360.in/wp-content/uploads/2024/02/SVD_6441-copy.jpg)
नांदेड| राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्यावतीने शनिवारी संतशिरोमणी जगद्गुरू रविदासजी महाराज यांची जयंती नांदेडमध्ये उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. शहरातील आयटीआय चौक येथील महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून शोभायात्रेला प्रारंभ झाला. सर्वप्रथम आ. बालाजीराव कल्याणकर यांनी संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेची पुष्पपूजा केल्यानंतर शोभायात्रेला प्रारंभ झाला. तसेच आ. मोहनराव हंबर्डे, आ. मोहनराव हंबर्डे, माजी जि. प. सदस्य साहेबराव धनगे, नगरसेवक प्रतिनिधी सुरेश हटकर यांनीही शोभायात्रेचे स्वागत केले.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या शोभायात्रेचे विविध समाजाच्यावतीने ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. या शाभेयात्रेत आकर्षक देखावे आणि भजनी मंडळांनी शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या शोभायात्रेत महिला, पुरुषांसह युवक आणि युवतींनीही उत्स्फूर्त सहभाग दर्शविला.
संतशिरोमणी जगद्गुरू रविदासजी महाराज यांच्या ६४७ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्यावतीने शनिवार, दि. २४ ङ्गेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता शहरातील महात्मा ङ्गुले पुतळा आयटीआयपासून निघालेल्या या शोभायात्रेच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सचिव संजय सोनटक्के, युवा राज्य उपाध्यक्ष संदीप गोरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष गजानन जोगदंड, दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेंद्र कांबळे, कार्याध्यक्ष के. के. गंगासागरे, दक्षिण कार्याध्यक्ष व्यंकटराव कांबळे, महासचिव रमेशचंद्र हराळे, उपाध्यक्ष मारोती हराळे, विजय इंगळे, संजय वाघमारे, सचिव सुनील माहुरे, सुरेश शेळके, विठ्ठल वाघमारे, जयंती मंडळ अध्यक्ष शिवानंद जोगदंड, माधव निंबाळकर, केरबा कसारे, महानगर जिल्हाध्यक्ष दिगंबर भाडेकर, गोविंद माऊली पार्डीकर, शक्तीनगर जयंती मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सोनटक्के, शेषराव आसोरे, विजय गोरे, राम वाघमारे,हेमंत सोनटक्के, नागोराव गंगासागरे, बालाजी गायकवाड, गणेश गोरे, अशोक गोरे, गोविंद गोरे, दत्ता दुधंबे, सुरज वाघमारे, रवी गंगासागरे, विशाल बनसोडे, विट्टज अन्नपूर्णे यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
![](https://newsflash360.in/wp-content/uploads/2023/11/Hardweyar-Nagu.jpg)