नांदेड। लोकसभा मतदार संघातील कार्यकर्त्यानी आजपासून लोकसभा निवडणूक जिकण्यासाठी तयारीला लागलं पाहिजे,असे प्रतिपादन आंबेडकर योद्धा श्याम निलंगेकर यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त परिवर्तन प्रतिष्ठानच्या सभागृहात भारतरत्न कर्पूरी ठाकूर यांच्या स्मृति दिनानिमित्त आयोजित केलेल्या अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ. व्यंकटेश काबदे हे होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे रयतेचेराज्य व भारतरत्न कर्पूरी यांच्या समाजवादी, धर्मानिरपेक्ष विचारच राज्य आणायचं असेलतर,आज पासूनच लोकसभा निवडणूकीच्या तयारीला लागलं पाहिजे,असे विचार श्याम निलंगेकर यांनी मांडले.
माजी आमदार गंगाधर पटणे, प्राचार्य डॉ.कल्याणकर, उपप्राचार्य बालाजी कोम्पलवार, शिक्षकनेते आर.जी.जाधव, महेबूब खां पठाण यांनी निवडणूक लढवून भांडवलंशाही व भ्रष्ट सरकार उध्वस्त केलं पाहिजे असे पडखद विचार मांडले. कार्यक्रमाचे संचालन किरण चिद्रावर यांनी तर आभार पांडुरंग निखाते यांनी मानले.
बैठकीस काकासाहेब डावरे,नामदेव चिचलवाड, बालाजी ताटे पाटील,शेख महेबूब शेख शादूल,रावसाहेब मोरे,दत्ता मोरे,नामदेव शिंदे,माधव पटणे, हिदायतुल्ला महेबूबखा, सैलानी महेबूब खा पठाण,बालाजी लिनूरकर,हरीश लुंगारे, बाबुराव केंद्रे,रसूल साहेब सरदार,भगवान लुंगारे, भगवान बडवणे,महेबूब खा हैदर खा,दत्ता चापळकर, चांद पाशा पठाण,काशिनाथ इसादकर,बाबुराव डोकलवार,राधा कांबळे,मारोती पवार उद्धव गुट्टे माधव मोरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती..