उमरखेड येथे संत शिरोमणी मन्मथस्वामी जयंती उत्साहात साजरी
उमरखेड| येथील शिवाजी वार्डातील महात्मा बसवेश्वर संस्थान शिव मंदिरात संत शिरोमणी मन्मथस्वामी जयंती निमित्त गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळ्याची सांगता आज उत्साहात संपन्न झाली. १६ व्या शतकातील वीरशैव संत परंपरेतील थोर संत,संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या ४६६ व्या जयंतीनिमित्त वीरशैव लिंगायत महिला मंडळातर्फे हा पारायण सोहळा व जयंती उत्सव सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सप्ताहात दररोज शिवपाठ, परमरहस्य पारायण, भजन आदी अनेक कार्यक्रम घेण्यात आले. आज दुपारी ठीक बारा वाजता संत शिरोमणी मन्मथ माऊलीचा जन्मोत्सव अत्यंत भक्तीपूर्ण व उत्साहात संपन्न झाला. यावेळी भजन व पाळणा गायन आदी कार्यक्रम घेण्यात आले. ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळा तसेच जयंती उत्सव कार्यक्रमासाठी श्रीमती रजनीताई वगरकर, श्रीमती लिलाबाई दुधेवार ,श्रीमती गिरजाबाई भोकरे, श्रीमती छायाबाई दुधेवार यांनी परिश्रम घेतले घेतले तर सौ. चंदा लाडेवार, सुजाता भोकरे, ज्योती भोकरे, संताबाई बिचेवार ,बेबीताई मंत्री, शोभा सुकळे, मीना पिंपळे, वैशाली नारेवार, शोभा दुधेवार, रत्नमाला दुधेवार, शिवकन्या दुधेवार, सुनिता हिंगमिरे, छाया दिघेवार ,अर्चना इंगळे ,सारिका इंगळे, रमाबाई वाघमारे, नंदाबाई दुधेवार, त्रिवेणाबाई रावले, नंदाबाई हिंगमिरे, शशिकला हिंगमिरे ,छाया इंगळे, शीलाताई लाशिनकर इत्यादि महिलांनी सहभाग घेतला तर प्रभाकर दिघेवार,गजानन रासकर,शिवहार बिचेवार,तुकाराम सुकळे,सागर बारे,सौरभ बिचेवार ईत्यांदीसह परिसरातील अनेक महीला भगानींची कार्यक्रमाला लक्षणीय उपस्थिती होती.