उमरखेड| अवैधरीत्या दोन जीवंत काडतुस सह गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीस पहाटे ४ वाजताचे दरम्यान उमरखेड महागाव रोडवरील संजेरी धाबा समोर स्थानिक गुन्हे शाखेने पकडले . राज्यात तसेच जिल्ह्यात गोळीबाराच्या घटनेने राज्य हादरले असतांना उमरखेड मध्ये अवैध अग्नीशस्त्र आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे .
याबाबत पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहीतीनुसार जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे आदेशानुसार जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखा यांनी पेट्रोलिंग व आरोपी शोध मोहीम सुरू ठेवली असता उमरखेड येथे रात्री तीन वाजताच्या दरम्यान पेट्रोलीग करत असतांना उमरखेड येथील इसम ताईफखान जहांगीर खान वय 21 रा सवेरा कॉलनी उमरखेड याचे जवळ गावठी कट्टा पिस्तूल असून तो महागाव रोडवरील संजेरी धाब्याजवळ येणार असल्याच्या गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनी गजानन गजभारे आपल्या ताफ्यासह सरकारी व खाजगी वाहनाने घेऊन माहिती स्थळी दाखल झाले असता सदर वर्णनाचा युवक आढळून आला.
त्याच ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याचे नाव ताईफ खान जहांगीर खान असून त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीचे देशी कट्टा व दोन जिवंत काडतुस मिळून आल्याने त्या कडे कोणताही परवाना नसून त्याने हे हत्यार अमजद खान सरदार खान रा पुसद याचे कडून 30 हजार रुपयांमध्ये विकत घेतले असल्याचे सांगितले त्यानंतर सदर युवकास ताब्यात घेऊन त्याचे कडून देशी कट्टा व जिवंत काडतुस अंदाजे 31 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्यास अटक करण्यात आली पोलिसांनी ताईफ खान जहागीर खान पठाण रा उमरखेड व अमजद खान सरदार खान रा वसंत नगर पुसद या दोघां विरोधात पीएसआय अमोल राठोड यांच्या फिर्यादीवरून आर्म अॅक्ट 3 , 25 ,35 भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड व पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी गजानन गजभारे , पीएसआय अमोल राठोड , रेवन जागृत ,तेजाब रणखांब, सुभाष जाधव ,कुणाल मुंडेकार ,रमेश राठोड, मोहम्मद ताज ,सुनील पंडागळे यासह स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी यांनी पार पाडली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड व ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अनिल साळवे करीत आहेत .