हिमायतनगर। संतांची शिकवण ही आदर्श समाज निर्माण करणारी असून मानवासाठी सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे” असे प्रतिपादन हुतात्मा जयंतराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या तिसऱ्या दिवशी दुपारच्या बौद्धिक सत्रामध्ये सरस्वती विद्यामंदिर कला महाविद्यालय किनवट येथील संत साहित्याचे गाढे अभ्यासक तथा महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीचे सदस्य शाहीर प्रो. मार्तंड कुलकर्णी यांनी मौजे मंगरूळ येथे केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या डॉ. शेख शहेनाज या होत्या. तर मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. द्वारकाप्रसाद वायाळ तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी भदरगे व सहकार्यक्रमाधिकारी डॉ. एल. बी. डोंगरे व प्रा. वसुंधरा तोटावाड मॅडम आदी होते. आपल्या उगवत्या शैलीतून उपस्थितांना मंत्रमुग्ध करत शाहिरी, पोवाडे व व्याख्यानाच्या माध्यमातून संतांची शिकवण व समाज या विषयावर डॉ. मार्तंड कुलकर्णी यांनी मौलिक असे मार्गदर्शन केले.
याबरोबरच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयावर प्रा. द्वारकाप्रसाद वायाळ यांनीही आपले सविस्तर विचार मांडले. सदरील बौद्धिक सत्राचे सुत्रसंचलन छत्रपती शिवाजी महाराज ग्रुप ची शिबिरार्थी सविता सातपुते या विध्यार्थ्यांनी ने केले. तर याच ग्रुप ची भाग्यश्री वानखेडे या विध्यार्थ्यीनीने आभार मानले. या प्रसंगी शिबिरार्थी विध्यार्थ्यी व विध्यार्थ्यीनी सह गावातील नागरिक उपस्थित होते. व शेवटी कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.