नांदेड जिल्हा परिषदेत ‘ई–फाईलिंग ट्रेकिंगला सुरुवात; प्रायोगिक तत्वावर शिक्षण व आरोग्य विभाग -सीईओ मीनल करनवाल यांची माहिती
नांदेड| विविध विभागातील प्रलंबित संचिका निकाली काढण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेत ई- फाईल ट्रॅगिंक सिस्टिमची सुरवात करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्वावर या प्रणालीव्दारे शिक्षण व आरोग्य विभाग ऑनलाईन करण्यता आला आहे, अशी माहिती नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिली आहे.
दिनांक 9 जानेवारी 2024 पासून या प्रणालीव्दारे प्रायोगिक तत्वावर आरेाग्य विभाग तसेच शिक्षण विभाग प्राथमिक व माध्यमिक विभागात हे काम सुरू करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेची कामे होत असतात. मात्र, काही वेळेला कामे होत नसल्यामुळे गावकऱ्यांना जिल्हा परिषदेत यावे लागते. त्यामध्ये किनवट, माहूर, देगलूर, मुखेड असे तालक्यातून यावे लागते. ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी ई फाईलिंग ट्रॅकिंग सिस्टिम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नांदेड जिल्हा परिषदेमध्ये कामांना गती मिळविण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. या संदर्भाने विभागप्रमुखांची बैठक घेऊन आढावा घेण्याला. तसेच प्रायोगित तत्वावर सर्वांत मोठी आस्थापना आणि काम असलेल्या शिक्षण आणि आरोग्य विभागात ही योजना राबविण्याचे ठरले. त्यानुसार प्राथमिक, माध्यमिक शिक्षण तसेच आरोग्य विभागात काम सुरू करण्यात आली आहेतं.
आवकमध्ये येणारी फाईल तसेच पत्रापासून या संचिकेचा प्रवास सुरू होणार आहे. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याकडे हे पत्र किंवा फाईल गेल्यानंतर या नस्ती प्रणालीवर क्यूआर कोड मिळेल. त्याची लॉगिन संबंधित कर्मचारी करेल आणि त्या फाईलची नोंद केल्यानंतर त्या फाईलला क्रमांक मिळणार आहे. त्यानंतर अधीक्षक, कक्ष अधिकारी यांच्याकडून वरिष्ठानपर्यंत फाईलचा प्रवास राहणार आहे. त्यासाठी प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांना लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळाले आहेत. त्यानुसार त्यांच्या कामला सुरवात झाली आहे.
जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी विविध महत्त्वाकांक्षी कामे हाती घेतली असून त्यात हे वैशिष्ट्यपूर्ण काम आहे. यामध्ये दप्तर दिरंगाई टाळणे, फाईल प्रलंबित न राहणे तसेच कोणत्या कर्मचाऱ्यांकडे किती वेळ फाईल राहिली याचा आढावा देखील आता घेता येणार आहे. ई- ट्रँकिंग सिस्टीम फाईलद्वारे सर्व फाईलींचा प्रवास ऑनलाईन झाल्यामुळे सर्व कामे आता काल मर्यादेत होत आहेत. ही प्रणाली सुरू झाल्यापासून शिक्षण व आरोग्य विभागातील 582 फाइल्सची या पोर्टलवर नोंद झाली असून अनेक फाइल्स निकाली निघाल्या आहेत. यानंतर आता सर्व विभागात ही प्रणाली सुरू करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवान यांनी दिली आहे.