नवीन नांदेड। जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या वतीने नावीन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत विष्णुपुरी ग्रामपंचायत येथे बालिका पंचायत समितीसाठी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी बालिका पंचायत समिती सरपंच पदी श्रद्धा पांचाळ, उपसरपंच अपुरावा बचेवार, सचिव प्रतिक्षा सोनकांबळे, यांच्यी बिनविरोध निवड करण्यात आली व समिती पदाधिकारी यांच्यी निवड करण्यात आली.
जिल्हा परिषद नांदेड येथील मुख्यकार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या आदेशानुसार दिनांक १० फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत विष्णुपुरी येथील सभागृहात सकाळी ११ वाजता सरपंच सौ.संध्या विलास हबर्डे यांच्या अध्यक्षतेखाली बालिका पंचायत समितीची निवड करण्यात आली, यावेळी उपसरपंच अर्चना विश्वभांर हबर्डे, ग्रामविकास अधिकारी संजय कानोडे व ग्रामपंचायत सदस्य प्रियंका हबर्डे, सदस्यांची व अंगणवाडी ताई, ग्रामपंचायत कर्मचारी संतोष हबर्डे,ऊग्रसेन हबर्डे यांच्या सह मोठ्या प्रमाणात महिला, विधार्थीनी उपस्थित होत्या.
बालिका समिती सरपंचपदी श्रद्धा पांचाळ,उपसरपंच अपूर्वा बचेेवार, सचिव प्रतिक्षा सोनकांबळे, सदस्य श्रद्धा हबर्डे,, श्रावणी हटकर, श्रद्धा कंधारे,मयुरी रिंगे,समिक्षा पवार,संस्कृती हबर्डे, भक्ती येवले, प्रतिक्षा कांबळे, अंकिता गाढे,श्रेेया हंकारे,विघा शिंदे, प्रगती बलखंडे यांच्यी बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत सरपंच संध्या हंबर्डे यांच्या वतीने समिती पदाधिकारी यांच्या शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
सामाजिक, राजनैतिक विकासाला सक्रिय भागीदारी सुनिश्चित करण्यासाठी हि सुरवात आहे, या समिती बेटी बचाव बेटी पढाव या अभियानासाठी निवड,व समिती मध्ये ११ ते २१ वयोगटातील मुलीसाठी निवड हि बालिका पंचायत सामाजिक विकासाला चालना देण्यासाठी व बालविवाह हुंडाबळी, टाळण्यासाठी ही समिती काम करणार असून यामध्ये समावेश असलेल्या मुलींना राजकीय क्षेत्रात सक्रिय करण्यासाठी शासनाने हा उपक्रम राबविला असून नांदेड तालुक्यातील विष्णपुरी येथे या अभियानाची सुरूवात केली आहे.