नांदेडराजकिय

गरजू लाभधारकांनी सोनोग्राफी सेंटरचा लाभ घ्यावा – आमदार माधवराव पाटील जवळगावकर

हिमायतनगर, अनिल मादसवार| अर्थिक परिस्थिती चांगली नसलेलेच रुग्ण ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी येत असतात. गोरगरिबांना चांगले उपचार मिळावे म्हणुन आपण सातत्याने प्रयत्न करीत आहोत. याचाच एक भाग सोनोग्राफी सेंटरचा असून, रुग्णालयात आज या सोनोग्राफी सेंटरचा शुभारंभ होते ही आनंदाची बाब आहे. येथे कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडावे व जास्तीत जास्त गरजू लाभधारकांनी सोनोग्राफी सेंटरचा लाभ घ्यावा असे अवाहन आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले.

ते नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात दि. ९ शुक्रवारी सोनोग्राफी सेंटरचा शुभारंभ प्रसंगी बोलत होते. प्रथमतः आरोग्य देवतेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. जाधव यांच्याहस्ते आमदार जवळगावकर व हिंगोली लोकसभा निवडणुकीचे भावी उमेदवार डॉ.अंकुश देवसरकर यांचा शाल श्रीफळ व पुषपहाराने स्वागत सत्कार करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना जवळगावकर म्हणाले कि, भविष्यात कोणतीही अप्रिय घटना घडल्यास ग्रामीण रुग्णालयाची सेवा अपूरी पडणार नाही, याची काळजी घेतली असून, येथे उपजिल्हा रूग्णालय कार्यान्वित व्हावे यासाठी शासनस्तरावर प्रयत्न चालू आहेत. तसेच ट्रामाकेयर सेंटरची ही मागणी करण्यात आलेली आहे. रूग्णाबरोबर त्यांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी आसन व्यवस्थाही विचाराधीन असून, ही सर्व कामे लवकरच पुर्ण करण्यात येतील असेहि आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी सांगीतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षक डॉ. जाधव यांनी केले.

हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जाधव यांच्याहस्ते आमदार जवळगावकर यांचा सत्कार करण्यात आला. छायाचित्र – अनिल मादसवार
हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जाधव यांच्याहस्ते हिंगोली लोकसभा भावी उमेदवार डॉ.अंकुश देवसरकर यांचा सत्कार करण्यात आला. छायाचित्र – अनिल मादसवार

यावेळी काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी, माजी जि. प. सदस्य सुभाष राठोड, समदखान पठाण, सभापती जनार्दन ताडेवाड, चेयरमन गणेशराव शिंदे, माजी सभापती परमेश्वर गोपतवाड, माजी नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद, सिप्राचे दिलीप आला राठोड, डाॅ. गणेश कदम, शहराध्यक्ष संजय माने, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, डाॅ. प्रकाश वानखेडे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान पठाण, सुभाष शिंदे, विलास वानखेडे, बाकी सेठ, योगेश चिलकावार, मनानभाई, डि. डी. काळे, दशरथ हेंद्रे, खालीदभाई, प्रमोद राठोड, संदिप कोमावार, शेख शफी, पापा पार्डीकर, पंडित ढोणे, जेष्ठ पत्रकार अशोक अगुलवार, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष दत्ता शिराने, अनिल मादसवार, सोपान बोम्पीलवार, नागेश शिंदे, आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

 

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!