ईस्लापूर/किनवट,गौतम कांबळे। ईस्लापुर परिसरातील तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ असलेल्या सहस्त्रकुंड धबधबा येथील मूर्ती गायब प्रकरणी अज्ञाता विरुद्ध येथील पुजारी शामराव हनमंत सातपुते यांच्या फिर्यादी वरून ईस्लापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटने प्रकरणी नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन सपोनी उमेश भोसले यांनी केले आहे.
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील सहस्रकुंड येथील पर्यटन स्थळ परिसरात श्रीराम शबरी माता आश्रम असून या आश्रमातील श्रीराम, सीता, लक्ष्मण यांची मूर्ती गायब झाल्याची घटना दि. 4 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली असून सदरील घटना दि. 5 जानेवारी रोजी उघडकीस आली आहे.
या घटनेची माहिती समाज बांधवांना मिळताच त्यांनी या आश्रमाकडे धाव घेऊन येथील पाहणी केली असून या घटने प्रकरणी समाज बांधवांनी संताप व्यक्त करत ईस्लापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन मूर्तीची चोरी करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी लावून धरली.
याच घटने प्रकरणी ट्रस्टचे सचिव सतीश वाळकीकर यांनीही मूर्ती गायब झाल्याची तक्रार ईस्लापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. या वरून ईस्लापूर पोलीसांनी घटना स्थळी धाव घेऊन सदरील येथील पुजारी शामराव सातपुते यांच्या फिर्यादी नुसार गुन्हा दाखल करून या बाबत योग्य तपास करून कृत्य करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल.
नागरिकांनी या मूर्ती गायब व विटंबना बाबत कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता या घटने प्रकरणी श्वान पथकास देखील पाचारण करण्यात आले आहे . साक्षीदाराचे जवाब घेतले आहे. जवाबात संशयिताचे नाव नोंदविण्यात आले आहे. फिर्यादीच्या ताब्यात मुर्त्या देण्यात आले आहे. या बाबत तपासांती असे कूत्य करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करणार असल्याचे सपोनी उमेश भोसले यांनी म्हणले आहे.
या प्रकरणी तपासा अंती काय सत्य समोर येईल हे समोरच कळेल. दरम्यान सदर घटना ही गंभीर स्वरूपाची असल्याने भाजपाचे आध्यात्मिक आघाडीचे श्याम भारती महाराज यांनी घटना स्थळी भेट देऊन झालेल्या घटनेबाबत तीव्र निषेध व्यक्त करून समाज बांधवांना पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करत या घटने प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे.