नवीन नांदेड़। रस्ता सुरक्षा अभियान 2024 हे दिनांक 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत परिवहन विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

या अंतर्गत नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षा विषयक माहिती व प्रबोधन व्हावे याकरिता एलईडी वाहनांद्वारे रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती दिनांक 06 ते 11फेब्रुवारी24 पर्यत करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. उपरोक्त एलईडी वाहनांची आज दिनांक 5फेब्रुवारी 24 रोजी संध्याकाळी 05.30 वाजता प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेड येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड शैलेश कामत यांचे हस्ते फित कापून रवाना करण्यात आले आहे.

यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी . अविनाश राऊत,मोटार वाहन निरिक्षक विजयसिंह राठोड, श्रीमती भाग्यश्री देशमुख, श्रीमती रेणुका राठोड, सहा. मोटार निरिक्षक नितीन राख,केशव जावळे, सतीश भोसले,सचिन मगरे व लिपीक कर्मचारी राजेश गाजुलवाड, गजानन शिंदे,गजानन पवळे, व इतर कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या वेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी उपरोक्त नांदेड शहरासह जिल्हयातील सर्व 16 तालुक्यामध्ये वाहनाद्वारे प्रबोधन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

