आंतरजातीय विवाह साठी रक्ताचे नातेवाईक शिवाय परवानगी देऊ नये
नवीन नांदेड। आंतरजातीय विवाह करत असतांना रक्ताचे नातेवाईक असल्याशिवाय प्रेम विवाहासाठी परवानगी देऊ नये यासाठी कायदा करावा अशी मागणी नांदेड जिल्हा सिडको हडको नागरिक कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
भारत देशाच्या कायद्या नुसार मुलीचं वय १८ वय व मुलाचे वय २१ वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीला व मुलाला आपल्या राज्यघटनेनुसार नोदणी विवाह करण्याचा अधिकार दिलेला आहे. आपल्या देशामध्ये आईने जन्मदिलेल्या बाळास पालन पोशन करुन मोठ करण्यात आई वडील यांच आयुष निघुन जाते,व जेव्हा मुल मुली मोठे होतात. लग्नाच्या वयात येतात. तेव्हा आई आई-वडील भाऊ चुलते यांना विश्वासात न घेता कुठलाही मुलगा मुलगी आंतरजातीय विवाह करतात. ‘पोलीस स्टेशनला जाऊन सुद्धा आई-वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करतात असे अनेक उदाहरण देशात राज्यात जिल्ह्यात आम्ही कार्यकर्ते म्हणून प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये पाहत आहोत.
परंतु आम्हा कार्यकर्त्यांना या गोष्टीवारंवार खटकत आहेत जवळपास ९० टक्के प्रेम विवाह शेवट पर्यंत टिकत नाही त्या वयामध्ये मुलीला व मुलाला काहीच कळत नाही असे आम्हाला वाटते. जेव्हा त्या मुलीला एखाद बाळ होते तेव्हा तिचा नवरा सोडून देऊन निघून जाते मग त्या मुलीला आई वडील सुद्धा स्वीकारत नाहीत व समाजसुधा स्वीकारत नाही मग ती मुलगी वाईट मार्गाला लागून तिचे आयुष्य बरबाद होते असे देशांमध्ये हजारो प्रकरण झालेले आहेत या देशांमध्ये प्रत्येक नागरिकांनाही गोष्ट माहित आहे प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा ही गोष्ट माहित आहे. परंतु आपल्या देशात कायदा असल्यामुळे पोलीस खाते सुद्धा दोघांना काही करू शकत. नाहीत म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो की, मुलगी व कागदपत्रे घेऊन लग्न करायला जातात. जेव्हा मुलगी आणि मुलगा न्यायलय आणि विवाह निबंधक कार्यालयला लग्नाला सहमती देत असतात. तेव्हा मुलीचे आई-वडील, भाऊ, मामा, साक्षी असल्याशिवाय या लग्नाला सहमती देऊ नये.
देशामध्ये हे कायदा तातडीने लागू करावा. ज्या मुलींना आई वडील व नातेवाईक नसतील व अनाथ शाळेत मुली व मुले असतील त्यांचा विवाह जर करायचा असेल त्या मुली मुलाला साक्षी म्हणून आयएस दर्जाचे अधिकारी विवाह निबंधक करताना. साक्षीदार असावे. हा कायदा लागु करण्यात आला नाही तर हजारो मुलीचे संसार उध्दवस्थ होत आहेत. व मुलीचे आई-वडील या विवाहा च्या नेराश्यातुन आपली जिवन यात्रा संपवत आहेत. आपन या परिस्थिति चा विचार करून नवीन कायद्याची तरतूद करण्यात यावी.
यापूर्वी दिनांक १०/०७/२०२३ रोजी आपणास निवेदन दिलं होतं व दिः २६/०९/२०२३ रोजी सुध्दा दिले होते.
परंतु अद्याप कुठलाही कायदा झालेला दिसून येत नाही. आपणास चार ते पाच महिन्याचा कालावधी देऊन सुध्दा हा कायदा लागू झाला नाही, आपल्या देशामध्ये उत्तर प्रदेश सरकारने व गुजरात सरकारने हा कायदा पारित केला आहे,याच धर्तीवर हा कायदा लागू करून आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा,अन्यथा लोकशाही मार्गाने दिः १४ फेब्रुवारी २४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर अमरण उपोषणाला सुरुवात करणार आहोत,याची शासनाने नोंद घेउन न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली असून उपोषणकर्ते म्हणून वैजनाथ देशमुख,ज्योती कदम, गजानन कहाळेकर,अभिषेक जोशी, प्रमोद रेवणार, धिरज स्वामी, हे उपोषणास बसणार आहेत तर किशोर देशमुख, सतिश बसवदे, माजी नगरसेवक संजय इंगेवाड, सिध्दार्थ गायकवाड, राजु लांडगे, सुनिल अंनतवार, कृष्णा पांचाळ, संतोष अष्टेकर, राजन जोजारे,दिंगाबर शिंदे, संदीप कदम, शिवम कदम,सुनिल वडगावकर, व्यकोंबा येडे, सचिन रावका यांनी स्वाक्षरी केली आहे.