नांदेड| ऑडीटर्स कौन्सिल अँड वेलफेअर असोसिएशन,पुणेच्या जिल्हा शाखा नांदेड तर्फे आयोजित नांदेड जिल्ह्यातील प्रमाणित लेखापरीक्षकांचा मेळावा हॉटेल ताज पाटील येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हा विशेष लेखापरीक्षक, वर्ग-१, श्रीकांत चौधरी साहेब, प्रमुख मार्गदर्शक जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड विश्वास देशमुख साहेब, प्रमुख अतिथी नांदेड तालुका उपनिबंधक, सहकारी संस्था, बालाजी बोधागिरे साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा देखरेख संघ, नांदेड अनिल चव्हाण साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.
विश्वास देशमुख साहेब बोलताना म्हणाले की, सहकार क्षेत्र सदृढ व्हावेत म्हणूनच प्रमाणित लेखापरीकांची नेमणूक करण्यात येते त्यामुळे लेखापरीक्षणाचा दर्जा हा १००% पारदर्शक राखला पाहिजे आणि लेखापरीक्षण हे समवर्ती पद्धतीने चालणारे काम असल्यामुळे दोषांची पूर्तता पुर्ण होईपर्यंत लेखापरीक्षण चालतच राहणार आहे. असोसिएशनच्या ज्या काही अडचणी व मागण्या असतील त्या निवेदनाद्वारे आम्हाला दिल्यास त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन दिले तर भविष्यात वेलफेअरच्या माध्यामतून चांगली कामे होतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष संभाजी सुर्यवंशी यांनी असोसिएशनच्या माध्यमातून भविष्यातील होणाऱ्या कामकाजावर उजाळा टाकला व म्हणाले की, १९९२ सालापासून प्रमाणित लेखापरीक्षक यांना मिळणाऱ्या ऑडीट फिस धोरणामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल झाले नसल्यामुळे आजच्या वाढत्या महागाईचा विचार करता असोसिएशनच्या माध्यमातून शासन दरबारी ह्या ऑडीट फिसमध्ये सुधारणा होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वचन दिले. जिल्ह्यातील प्रमाणित लेखापरीक्षक यांना प्रत्यक्ष संस्थास्थरावर लेखापरीक्षणाचे कामकाज करतांना येणाऱ्या अडी-अडचणी तथा त्यावर उपाययोजना यावर चर्चा व मार्गदर्शन झाले तर येणाऱ्या दि.२० व २१ फेब्रुवारी रोजी देवगड जिल्हा अहमदनगर येथे सर्टिफाईड ऑडीटर्स (प्रमाणित लेखापरीक्षक) यांचेसाठी राज्यस्तरीय अधिवेशन व कार्यशाळेस मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे अवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश सालेगावकर यांनी तर आभार प्रदर्शन रविशंकर विश्वकर्मा यांनी केले. कार्ययक्शरम स्वीरित्या पार पडण्याकरिता असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष आत्माराम कदम, जिल्हा सचिव विश्वकर्मा रविशंकर, कोषाध्यक्ष राजेश सालेगावकर, सहसचिव संतोष सरकटे यांनी अथक परिश्रम घेतले.