नांदेड। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार ,प्रदेशाध्यक्ष तथा माजी जलसंपदा मंत्री खा.सुनील तटकरे यांच्या हस्ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी मुंबई येथील पक्ष कार्यालयात कन्हैया कदम यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस मागील पंधरवाड्यात नियुक्ती करण्यात आली होती .
तसेच आज त्यांना वर्धा ज़िल्हा पक्षनिरीक्षक ही दुसरी जबादारी त्यांना देण्यात आली .पक्ष संधटनेत काम करायचा दांडगा अनुभव असल्या मुळे नियुक्ती झाल्याचं बोललं जात आहे .राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ,उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धैय धोरणे, विचार घेऊन सर्वमान्यासाठी साठी काम करणार असे कन्हैया कदम यांनी सांगितले .सन 2012 रोजी राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसच्या तालुका उपाअध्यक्ष पदा पासून कदम यांनी काम करायला सुरुवात केली व त्यांच्या राजकीय जीवनाला राष्ट्रवादी विधार्थी काँग्रेसच्या माध्यमातून सुरुवात झाली.
तसेच तालुका उपाअध्यक्ष या पदावर सुरुवातीला त्यांनी काम केले नंतर 2013 ते 2017 पर्यंत त्यांनी ज़िल्हाउपाध्यक्ष पदी काम तीन वेळा काम केले .सन 2017 मध्ये त्यांच्या राष्ट्रवादी विधार्थी काँग्रेस नांदेड चे ज़िल्हाध्यक्ष म्हणून पक्षाने जबादारी सोपवली ,ज़िल्हाध्यक्ष झाल्या पासून पायाला फिंगरी लावल्या सारखा विध्यार्थ्यांच्या न्याय हाका साठी वेळो वेळी मोर्च,वेगवेगळे आंदोलन ,निवेदने नोकरी मेळावा च्या माध्यमातून 800 बेरोजगार युवक -युवतींना नोकरी मिळवून दिली.
तसेच मागील दीड वर्षा पासून राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशउपाध्यक्ष पदा वर काम करत होते .त्यांनी केलेल्या विविध पदावरील काम तसेच सोबत काम करण्याचा त्याचा दांडगा अनुभव असल्या मुळे व कदम यांनी केलेल्या कामाच्या बळावर त्यांची रा.यु.काँ. च्या प्रदेशसरचिटणीस तसेच वर्धा ज़िल्हा निरीक्षक अस्या दुहेरी जबादारी देण्यात आली .