ज्येष्ठ पत्रकार म.आ.चौधरी यांचे निधन
![](https://newsflash360.in/wp-content/uploads/2024/02/m.a.choudhari-nidhan.jpg)
किनवट। साहित्यिक, शिक्षक, पत्रकार आणि विविध क्षेत्रात कार्यरत असणारे सामाजिक कार्यकर्ते मधुकर आनंदराव चौधरी यांचे दि. १ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता येथील राहत्या घरी निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई,नात असा परिवार आहे. किनवटचे पत्रकार आशिष देशपांडे यांचे ते सासरे होत. त्यांच्या पार्थिवावर दि. १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता किनवटच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
बी.एसस्सी., बी.एड्.झालेले म.आ.चौधरी हे किनवटच्या कॉस्मॉपॉलिटीन विद्यालयात शिक्षक म्हणून अनेक वर्षे कार्यरत होते.ग़णित विषयाचे ते तज्ज्ञ होते. त्यांचा वाचनाचा व्यासंग दांडगा होता. ज्येष्ठ साहित्यिक पु.ल.देशपांडे, बाबा कदम, प्र.के. अत्रे, वि. वा. शिरवारडकर,व.पु.काळे, राम गणेश गडकरी, ह.ना . आपटे, धनंजय कीर यांच्याशी त्यांचे जिव्हाळयाचे नाते होते.
विविध वृत्तपत्रांमधून त्यांनी अनेक वर्षे पत्रकारिता केली. लेखणीतून अनेक वंचित, दुर्लक्षित समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शहर व तालुक्यातील अनेक समस्यांचा अभ्यास करीत त्यांनी या समस्या पत्रकारितेच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न केला.किनवट जिल्हा निर्मितीच्या आंदोलनात ते सक्रिय होते.ा भगवान गौतम बुद्ध सारख्या नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन त्यांनी ठिकठिकाणी केले होते.
त्यांच्या निधनाबद्दल माजी आमदार प्रदीप नाईक, ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिर्क दादाराव कयापाक,डॉ.सुनील व्यवहारे, माजी नगराध्यक्ष हाजी इसाखान, माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेम्मानीवार,आनंद मच्छेवार., के. मूर्ती, प्रदीप वाकोडीकर, फुलाची गरड,नंदू संतान, कादर दोसानी, सुनील श्रीमनवार, तालुक्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते, व्यापारी, डॉक्टरांनी दु:ख व्यक्त केले आहे.
![](https://newsflash360.in/wp-content/uploads/2023/11/Hardweyar-Nagu.jpg)