नवीन नांदेड| वार्षिक स्नेह संमेलनातून विधार्थी यांच्या सप्त गुणांना वाव मिळत असतो. यामध्ये सादर केलेल्या कलेतून अनेक विद्यार्थी तालुका व जिल्हास्तरावर सादरीकरण करून नावलौकिक झाले असल्याचे प्रतिपादन प्राथमिक मुख्याधापक मटकमवाड यांनी उदघाटन प्रसंगी केले.
शिक्षण प्रसारक मंडळ सिडको संचालित गोदावरी बालक मंदीर,विघानिकेतन प्राथमिक व माध्यमिक विघालय हडको येथे वार्षिक स्नेह संमेलन अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन ३१ जानेवारी रोजी करण्यात आले होते. या वेळी कार्यक्रम ऊद्घाटक प्राथमिक मुख्याध्यापक बि.के.मटकमवाड,तर प्रमुख पाहुणे सि.पी.नागठाणे, मंगेश राऊत, एस.एस.चिद्रावार, नगरसेविका सौ.बेबीताई जनार्दन गुपीले,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप,उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड,नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर, पत्रकार दिंगाबर शिंदे, छायाचित्र सारंग नेरलकर यांच्या सह मान्यवरांच्यी उपस्थिती होती.
प्रारंभी रिघ्दी सिध्दी या गीतांनी सुरूवात केली,यावेळी पोवाडा, विविध हिंदी मराठी गिते, लावणी, भीमगीते,यासह अन्य गितावर सहभागी विधार्थी यांनी सादरीकरण केले. दोन तास हा सांस्कृतिक कार्यक्रम झाला यावेळी अनेक गितावरील नृत्यावर प्रेक्षकांच्या प्रतिसाद,टाळयाचा कडकडाट होत होता,शंकर माने यांनी सुत्रसंचलन केले, यावेळी परिसरातील युवकांनी, महिलांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.