नांदेड| नांदेड जिल्हा कारागृहात अधीक्षक सुभाष सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी कारागृह विभाग क्रीडा स्पर्धा सन 2024 च्या क्रीडा स्पर्धेत पारीतोषक प्राप्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशंसापत्र देवून शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच कारागृह शिपाई यांचे कारागृह हवालदार पदी पदोन्नती झाल्याबाबत त्यांना पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करण्यात आले.
प्रजासत्ताक दिन व प्रजासत्ताक अमृत महोत्सवानिमित्त पोलीस मुख्यालय नांदेड येथे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या कारागृहातील महिला कर्मचारी अर्चना डाखोरे यांना पुष्पगुच्छ व प्रशंसापत्र देवून गौरव करण्यात आला.
तसेच साथी संस्थाचे राजू गायकवाड (पीपीएम) मुंबई यांच्यामार्फत नांदेड जिल्हा कारागृहात बंद्यासाठी देशभक्तीपर गिते व भजन किर्तन इ. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अधीक्षक सुभाष सोनवणे व तु.अ.श्रेणी-1 बी.एन मुलानी यांच्या हस्ते महिला व इतर बंद्याना प्रोत्साहनपर बक्षिस देवून मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास तु.अ.श्रेणी-1 बी.एन मुलानी, तु.अ.श्रेणी-2 डी.डी.रुकमे, सुभेदार व इतर कर्मचारी उपस्थित होते.