शिवा कर्मचारी महासंघाच्या नांदेड उत्तर जिल्हाध्यक्षपदी रविंद्र पांडागळे तर सचिवपदी शिवकुमार देशमुख यांची निवड
नांदेड। शिवा कर्मचारी महासंघ जिल्हा नांदेड या कर्मचारी संघटनेच्या जिल्हा पदाधिकारी यांची पुनर्रचना व नवनियुक्ती करण्यात आली.
शहरातील शासकीय विश्रामगृह येथे अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा पार पडला. सदर मेळाव्यास शिवा संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष तथा सेवा जनशक्ती पक्षाचे प्रमुख प्रा . मनोहरराव धोंडे हे अध्यक्षस्थानी होते. यासोबतच शिवा संघटनेच्या सर्व आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष जिल्ह्यातील कार्यकर्ते तसेच बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते.
नांदेड जिल्हा शिवा कर्मचारी महासंघाच्या पदाधिकारी कार्यकारिणीची पुर्नरचना प्रा. मनोहर धोंडे यांच्या आदेशानुसार व विठठलराव ताकबीडे, इंजी.अनिल माळगे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा अध्यक्ष संजय कोठाळे यांनी घोषित केली. राज्य, विभाग, जिल्हा व तालूका स्तरावरील नवनियुक्त पदधिकारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नवनियुक्त पदाधिकारी व त्यांचे पद पुढीलप्रमाणे : राज्य उपाध्यक्ष संतोष शेटकार, (प्रभारी उपशिक्षणाधिकारी नांदेड), जिल्हा मुख्य मार्गदर्शक दिगंबर मांजरमकर, वीरभद्र बसापूरे, नांदेड उत्तर – कार्यकारिणी मार्गदर्शक: डी. एम. पांडागळे, प्रा.रामकिशन पालीमकर, सल्लागार : बाबुराव कैलासे, शिवाजी कहाळेकर, जिल्हाध्यक्ष रविद्र पांडागळे, जिल्हा सचिव शिवकुमार देशमुख, संघटक विश्वनाथ कोळगीरे, डी डी हिंगमीरे, माधव मुंडकर, वसंत जारीकोटे, सहसचिव बाळासाहेब मटके, संजय वाकोडे, गणेश मुगावे, उपाध्यक्ष देवीदास टाले, रमाकांत पाटील, सतीश व्यंकटपुरवार, प्रसिद्धी प्रमुख विठ्ठल मुखेडकर तर तालूका निहाय कार्यकारिणी अर्धापूर मार्गदर्शक रंगराव बारसे, तालूका उपाध्यक्ष देवानंद बिच्चेवार, सचिव हरीहर मरशिवणे आदींची सर्वानुमते निवड करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सोपानराव मारकवाड (कोषाध्यक्ष – सेवा जनशक्ती पार्टी) दिलीपराव बास्टेवाड (माजी जि.प. सदस्य) यांची प्रमुख उपस्थिती होती .