
नवीन नांदेड। महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परिक्षेत सिडको परिसरातील व मुळगाव कांकाडी (दरे) ता. जि. नांदेड येथील बालाजी शिवाजी कदम हे राज्यात १९ वे आले असून त्याचे मित्र मंडळी यांच्या कडून अभिनंदन होत आहे.
बालाजी शिवाजी कदम यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सिडको येथील शिवाजी हायस्कूल येथून झाले असून उच्च माध्यमिक शिक्षण गुरु गोविंद सिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालय विष्णपुरी येथुन झाले असून बी टेक ही येथे झाले आहे, यापुर्वी राज्य सेवा मुख्य परिक्षेत २०२१ साली राज्यात १२ वे आले होते, तर यावर्षी २०२२ मध्ये झालेल्या परिक्षेत १९ वा येण्याचा बहुमान मिळाला आहे.
वडील शिवाजी कदम हे नांदेड सिडको परिसरा लगत असलेल्या टेक्सकाॅम येथे कर्मचारी म्हणून कार्यरत होते, बालाजी कदम यांनी यापुर्वी विविध स्पर्धा परिक्षेत यश मिळवले आहे, या यशाबद्दल नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेडचे माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे, युवा नेते ऊदयभाऊ देशमुख, नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण देशमुख, माजी अध्यक्ष रमेश ठाकूर, पत्रकार दिगंबर शिंदे, संदीप कदम, छायाचित्रकार सांरग नेरलकर यांनी सत्कार करून अभिनंदन केले आहे.
