श्री विश्वेश्वर आयुर्वेद व गोवर्धन गोसेवा प्रकल्पाच्या वतीने आयोजित आयुर्वेद गुरुकुलाचा थाटात शुभारंभ
नांदेड| आयुर्वेद हा मानवी आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे. त्यामुळे आयुर्वेदच मानवी आरोग्याच्या रक्षणासाठी भविष्यात संजीवनी ठरेल असा विश्वास माजी खासदार डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांनी व्यक्त केला .श्री विश्वेश्वर आयुर्वेद व गोवर्धन गोसेवक प्रकल्पाच्या वतीने मुदखेड तालुक्यातील कोल्हा येथे आजपासून तीन दिवसीय आयुर्वेद गुरुकुलाचे आयोजन करण्यात आले. या गुरुकुलाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर यशवंत पाटील, डॉक्टर अविनाश अमृतवाड , गोपालक , गोरक्षक मारुती कंठेवाड , सौ. सविता कंठेवाड, बालाजी कंठेवार डॉक्टर मंगेशराव नळकांडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती . या गुरुकुलाचे सूत्रसंचालन डॉक्टर नूतन गावंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर भाग्यश्री नरवाडे यांनी मांडले. प्राचीन काळातील गुरुकुलाचे महत्त्व वर्तमान परिस्थितीत पटवून देत , आयुर्वेद शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व आयुर्वेद डॉक्टरांसाठी अनुभवाची नवी शिदोरी बांधता यावी या अनुषंगाने श्री विश्वेश्वर आयुर्वेद व श्री गोवर्धन गोसेवा प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने मुदखेड तालुक्यातील कोल्हा येथे आजपासून तीन दिवसीय आयुर्वेद गुरुकुलाचे आयोजन करण्यात आले असून या गुरुकुलाचे उद्घाटन माजी खासदार डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य मराठवाडा भूषण असंख्य आयुर्वेदिक डॉक्टरांना गुरुकुल पद्धतीने ज्ञानदान करून त्यांना परिपक्व करत समाजसेवा घडवून आणणारे डॉ. अविनाश अमृतवाड व प्रसिद्ध गोपालक उद्योजक मारुती कंठेवाडी यांच्या संयुक्त पुढाकारातून दिनांक 19 जानेवारीपासून 21 जानेवारीपर्यंत मुदखेड तालुक्यातील कोल्हा येथे गुरुकुलाचे आयोजन करण्यात आले आहे . महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, आयुर्वेदिक शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमानातून हे गुरुकुल पार पडत असून मराठवाडा, महाराष्ट्र सह देशभरातून 300 पेक्षा अधिक डॉक्टर्स आणि विद्यार्थी या गुरुकुलाच्या प्रक्षिकानात सहभागी झाले आहेत.
आज दिनांक एकोणावीस रोजी सकाळी माजी खासदार डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांच्या हस्ते या गुरुकुलाचे उद्घाटन करण्यात आले. तत्पूरी डॉक्टर काबदे यांनी गोपालक मारुती कंठेवाड यांनी उभारलेल्या गोरक्षणास भेट दिली. येथील गाईंना चारा चारला. त्यानंतर ते उद्घाटकिय समारोपासाठी उपस्थित झाले होते. उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांनी मारुती कंठेवाड यांच्या गोपालनाची मुक्तकंठाने स्तुती केली . कासायाच्या घरी जाऊन बळी पडणाऱ्या गाईंना आपल्या गोरक्षनाथ आणून त्यांना जीवन देत भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्याचे काम मारुती कंठेवाड आणि सौभाग्यवती सविता कंठेवाड यांनी केली आहे. त्यामुळे या कुटुंबीयांचे अभिनंदन करावे तितके कमी असल्याचे आभावना डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांनी व्यक्त केल्या . आयोजित करण्यात आलेले आयुर्वेदिक गुरुकुल हे आयुर्वेदाचा अभ्यास करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांसाठी आणि डॉक्टरांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारे आहे. यातून वैश्विक ज्ञानाची पेरणी करण्यात येणार असल्याने भविष्यामध्ये हे डॉक्टर्स आणि संशोधक विद्यार्थी आयुर्वेदाला एक नवी उंची मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील शिवाय आयुर्वेदाचे महत्त्व शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.