हदगाव, शेख चांदपाशा। राज्याचे मुख्यमंत्री यांनी जरांगे पाटील यांना सन्मानाने मुंबईला निमंत्रित करावं असं अहवान हदगाव विधानसभा क्षेत्राचे आ. माधवराव पा. जवळगावकर यांनी त्यांच्या शहरातील निवासस्थानी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.
यावेळी विविध मुद्द्यावर चर्चा करण्यात आली, यावेळी बोलताना ते म्हणाले की जरांगे पाटलांनी केलेल्या अहवानला भरपूर प्रतिसाद मिळत आहे जिल्हास्तरावर लाखो नाही तर करोडच्या संख्यांमध्ये लोक सज्ज झाले आहे. सरकारला एवढीच विनंती आहे की, समाजाला वेठीस धरू नये समाजाची जी मागणी आहे ती समाजासाठी ज्या व्यक्तीने गेल्या आठ महिन्यापासून संघर्ष केला आहे त्यांना केवळ वारंवार आश्वासन देत आहात याविषयी तात्काळ निर्णय घेऊन मागणी पूर्ण करून त्यांना सन्मानाने मुंबईला जरांगे पाटलांना बोलवा व त्यांना जाणीव करून द्या की तुमच्या संघर्षातून यश मिळालेला आहे त्यांच्यावर उपोषणाची वेळ येऊ देऊ नका असा आवाहनही आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे केले आहे.
बऱ्याच दिवसानंतर पत्रकारांशी भेट…
हदगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर हे बऱ्याच कालावधीनंतर स्थानीय पत्रकारांना भेटले व शहरातील विकासाच्या संदर्भात चर्चा केली तसेच बायपास सर्जरी आठवडी बाजार व हदगाव शहरातील जुन्या भागातील नागरी सुविधा बाबत त्यांनी आवर्जून चर्चा करून लगेच निधी उपलब्ध करून तिथे काम सुरू करण्यासंबंधी आश्वासन दिले. सध्याच्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय स्थितीबाबत त्यांना पत्रकारांनी छेडले असता त्यांनी सावधपणे आपली प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, जे काँग्रेसचे पक्षश्रेष्ठ ठरवतील महाविकास आघाडी मध्ये तोच उमेदवार राहणार आहे यावेळी काँग्रेसचे व प्रसिद्ध डॉक्टर अंकुश देवसरकर अनिल पाटील बाभळीकर माजी नगराध्यक्ष अमित आरसूळ अन्य काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते