हिमायतनगर येथील युवा शेतकरी गजानन झरकर यांच दुःखद निधन

हिमायतनगर। येथील युवा शेतकरी गजानन दिनकरराव झरकर वय 42 वर्ष यांच आज सकाळी 6 वाजता दुखद निधन झाले, त्यांच्या पार्थिवावर हिंदू स्मशानभूमीत दुपारी 3 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
त्यांच्या मृत्यूनंतर आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, बहीण, भाऊ भाऊजई असा परिवार आहे. एक मनमिळाऊ आणि मेहनती शेतकरी म्हणून त्यांना सार्वजन ओळखत होते. रात्रपाळीत शेती पिकाला पाणी देऊन घरी आले असता त्यांना अस्वस्थ जाणवत होते, त्यामुळे रुग्णालयात ते स्वतः गेले, तिथून शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या जाण्याने झरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देवो हीच भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या पार्थिवावर हिमायतनगर येथील बोरगडी रोडवर असलेल्या हिंदू स्मशानभूमीत दुपारी 3 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती नातेवाईक व मित्रमंडळी यांनी दिली.
