हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील रहिवासी असलेल्या सुयशा मनोजकुमार श्रीश्रीमाळ यांनी चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे सीएच्या परीक्षेत यश संपादन करुन हदगाव विधानसभा क्षेत्रासह जिल्ह्यांत नाव उज्वल केले आहे. तिने मिळविलेल्या यशामुळे भावुक झालेल्या श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी शालेय विद्यार्थ्यांना लाडू देऊन आनंदोत्सव साजरा केला आहे.
हिमायतनगर येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांची नात कु. सुयशा मनोजकुमार श्रीश्रीमाळ हिने नोव्हेंबर २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाऊंटंट (सिए) ची परीक्षा दिली होती. या परिक्षेचा निकाल नुकताच हाती आला असून, यात कु. सुयशा हिने देशातुन ४३ व्या क्रमांक मिळविण्याचा बहुमान पटकावला आहे. नांदेड जिल्ह्यातुन या क्षेत्रात देशातुन ४३ वी येणाऱ्या कु. सुयशा श्रीश्रीमाळ ह्या पहिल्याच विद्यार्थ्यांनी ठरल्या आहेत. तिने मिळविलेल्या यशामुळे हिमायतनगर शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात भर पाडली आहे.
देशपातळीवर ४३ वा क्रमांक घेणाऱ्या नातीने मिळविलेल्या यशाचा आनंद सर्वासह कुटुंबातील सदस्यांना झाला असुन, परमेश्वर देवस्थान कमिटीचे ऊपाध्यक्ष तथा कु.सुयेशाचे आजोबा महावीरचद श्रीश्रीमाळ, विश्वस्त शांतीलाल श्रीश्रीमाळ यांनी मंदिर परिसरात येणाऱ्या शेकडो शालेय विद्यार्थ्यांना मिठाई देऊन आनंदोत्सव साजरा केला आहे. एव्हडेच नाही तर विद्यार्थी-विद्यार्थीनींना यश मिळविण्यासाठी अभ्यासाकडे लक्ष देण्याचे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले आहे.
याबाबत कु.आयेशा म्हणाली कि, तिला नांदेडचे प्रसिद्ध चार्टर्ड अकाऊंटंट जयप्रकाश पलोड यांचे मार्गदर्शन मिळाले असून, सततचा अभ्यास केल्याने हे सध्या झाले आहे. पुढे कंपनीमध्ये नौकरी करत यापुढचे शिक्षण चालू ठेवणार असून, गुरुजन वर्ग, आजी, आजोबा, आई, वडील यांना माझ्या या उज्ज्वल यशाचे श्रेय जातं असल्याचे त्या म्हणाल्या. तिने मिळविलेल्या यशाबद्दल खासदार हेमंत पाटील, माजी खासदार सुभाष वानखेडे, आ.माधवराव पाटील जवळगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, शिवसेना जिल्हाप्रमुख (शिंदे गट) बाबुराव कदम कोहळीकर यांच्यासह पत्रकार बांधवानी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.