नवीन नांदेड। जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी ता.मुखेड संचलित शिवाजी विद्यालय, सिडको, नांदेड शाळेत राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त नवीन नांदेड मधील पत्रकार बांधवांचा लेखणी देऊन सत्कार करण्यात आला.
६ जानेवारी रोजी दर्पण दिनानिमित्त सिडको परिसरातील विविध दैनिकांचा पत्रकार बांधव यांच्या सत्कार करण्यात आला, यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रा.एस.एम.देवरे, पर्यवेक्षक व्ही. एस.पाटील, सौ.ए.जी.देगावकर,सुनिल देवकर, प्रा.व्ही.डी जाधव,प्रा. मिलिंद रगडे, प्रा.विष्णु जाधव,बालाजी पाटोळे, एस.जी.भवर ,आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शंकर कापसे,नामदेव कोनापुरे, राम विजापुरे,बाबुराव शिंगनवाड व गजानन सुरेवाड यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.ए.जी. देगावकर यांनी केले.