नांदेड| पहिली ते आठवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना माध्यनह भोजन शिजवून खाऊ घालणाऱ्या कामगारांनी सीटू संलग्न महाराष्ट्र शालेय आहार कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे अभिवादन करून दि.८ जानेवारी रोजी दुपारी एक वाजता भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकताच शिक्षणाधिकारी डॉ.सविता बिरगे यांनी लेखी आश्वासन दिल्यामुळे आयोजित बेमुद्दत ठिय्या आंदोलनास तात्पुरती स्थगती देण्यात आल्याचे संघटनेचे सरचिटणीस कॉ.गंगाधर गायकवाड यांनी घोषित केले.
शालेय पोषण आहार कामगारांना ग्रामपंचायत निवडणूक झाल्यावर किंवा जवळ आल्यावर नाहक त्रास होत आहे. मुख्याध्यापक हे शाळेचे सचिव आणि शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष हे अध्यक्ष असतात. काही ठिकाणी सरपंच आणि शालेय शिक्षण समितीचे लोक मुख्याध्यापकास हाताशी धरून कामगारांना कामावरून काढून टाकण्यासाठी प्रयत्न करीत असल्याच्या तक्रारी सीटू कामगार संघटनेने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या कडे करून सातत्याने पाठपुरावा केला आय. त्याचे फलीत म्हणून राज्य सरकारने दि.१८ डिसेंबर रोजी शासन आदेश काढून मुख्याध्यापक आणि शालेय शिक्षण समितीचे पंख छाटत त्यांचे अधिकार काढून घेतलेत आणि पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी यांना दिले आहेत.
तसेच कामगारांना आपली बाजू मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. हा संघटनेचा खुप मोठा विजय असल्याचे कॉ. गंगाधर गायकवाड यांनी आपल्या भाषणात नमूद केले. केरळ राज्य शालेय कामगारांना दरमहा आठरा हजार रुपये मानधन देते मग छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरून सत्ता भोगणारे महाराष्ट्र राज्य तेवढे मानधन का देत नाही असा सवाल या वेळी उपस्थित करण्यात आला आणि तशी मागणी निवेदनात करण्यात आली. तामिळनाडू आणि पंजाब राज्यात कामगारांसाठी मेडिक्लेम योजना राबवित आहे मग महाराष्ट्रात का नाही. असे देखील राज्य सरकारला विचारण्यात आले आहे. स्थानिक मागण्यासह राज्य आणि केंद्र सरकारच्या स्तरावरील एकूण सोळा मागण्याचे निवेदन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकरी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना देण्यात आले आहे. निवेदनाच्या प्रति राज्याचे शिक्षण मंत्री दिपक केसरकर आणि नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांना सिईओ यांच्या मार्फत पाठविण्यात आल्या आहेत.
अंदीलणाचे नेतृत्व संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड, सीटू राज्य सचिव कॉ.उज्वला पडलवार, सीटू राज्य कमिटी सदस्य कॉ. करवंदा गायकवाड, कॉ. अनिल कराळे यांच्यासह जिल्हापदाधिकारी कॉ. जणार्धन काळे, कॉ. दिगंबर काळे, कॉ.साहेबराव दहिभाते, कॉ. दत्ता शिंदे, कॉ.नागोराव कमलाकर,कॉ.फारुख भाई मिस्त्री, कॉ. कांताबाई तारू, कॉ. लता गायकवाड, कॉ. इंदूबाई डोंगरे, कॉ. शिवाजी वारले, कॉ.गजानन वडजे, कॉ. संतोष शिंदे, कॉ.मारोती केंद्रे, कॉ.गोदावरी हाटकर आदींनी केले आहे. शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी लेखी आश्वासन दिल्यामुळे बेमुद्दत ठिय्या आंदोलनास तात्पुरती स्थगती देण्यात आल्याचे कॉ. गंगाधर गायकवाड यांनी कळविले आहे.