हिमायतनगर,असद मौलाना| ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने दर्पण दिन तथा पत्रकार दिन म्हणून संबंध महाराष्ट्रात साजरा केला जात आहे. हि संधी साधून हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील सर्व पत्रकार बांधवाचा हदगाव/हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या मार्गदर्शनखाली सामाजिक कार्यकर्ते शेख रफिक शेख महेबूब यांच्यातर्फे रविवार रोजी सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन येथील शासकीय विश्राम ग्रहात केले होते.
यावेळी प्रथमतः आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित जेष्ठ पत्रकार व काँग्रेस कार्यकर्त्यांकडून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सर्व पत्रकार बांधवाना भारीव गिफ्ट देऊन सन्मान करत पत्रकार दिनाच्या शुभेच्छा शेख रफिक देख महेबूब यांच्याहस्ते देण्यात आल्या. यावेळी शहरासह ग्रामीण भागातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आगामी येणाऱ्या काळात हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळे बांधकामातील एक गाळा पत्रकार भवनासाठी देण्यात येईल असे आश्वासन यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांच्याकडून तालुकाध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी दिले.
तर पत्रकार भावनांमध्ये लागणारे सर्व [रकारचे फर्निचर बनवून देण्याचे आश्वासन सामाजिक कार्यकर्ते शेख रफिक शेठ यांनी उपस्थित पत्रकार बांधवांना दिले. यावेळी जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, प्रकाश जैन, कानबा पोपलवार, गोविंद गोडसेलवार, सोपान बोम्पीलवार यांच्याहस्ते सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने त्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकार परमेश्वर गोपतवाड, प्रकाश जैन, कानबा पोपलवार, गोविंद गोडसेलवार, सोपान बोम्पिलवार ने सभी पत्रकार भाइयों की ओर से उनका स्वागत सत्कार कर धन्यवाद माना है. इस शुभ अवसर पत्रकार गंगाधर वाघमारे, पांडुरंग गाडगे, असद मौलाना, अनिल मादसवार, दिलीप शिंदे, वसंत राठौड़, चांदराव वानखेडे, सय्यद मनानं, देवानंद गुंडेकर, शुद्धोधन हनवते, पांडुरंग मिराशे, धम्मपाल मुनेश्वर, नागोराव शिंदे, संजय कवडे, विजय वाठोरे, अनिल भोरे, कृष्ण राठोड, मनोज पाटिल, फाहद खान, आनंदा जळपते, नागेश शिंदे, दाऊ गाडगेवाड, विष्णु जाधव, दत्ता पुपलवाड, अंगद सुरोशे, गंगाधर गायकवाड, शेख खय्यूम, धोंडोपंत बनसोडे, अनिल नाइक, लिंगोजी कदम आदींसह अनेकांची उपस्थिती होती.