हिमायतनगर, परमेश्वर काळे| चांगल्या कार्याला समाजापुढे मांडून समाजाला दिशा देण्याचे कामामध्ये पत्रकारांचा सिंहाचा वाटा मोठा आहे. समाज आणि पत्रकार यांचे नाते घट्ट व्हावे यासाठी पत्रकारांनी दुर्लक्षित घटकांना पुढे आणण्यासाठी लिखाण करावे. आणि चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभं टाकून अन्यायाला वाचा फोडण्याचे काम पत्रकारांनी करावं. आणि दर्पणकार बाळशात्री जांभेकरांच्या पत्रकारितेचा आदर्श जोपासावा, असे आवाहन हिमायतनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनूर यांनी केले.
ते हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या वतीने दि. ६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, कानबा पोपलवार, गोविंद गोडसेलवार, संजय मुनेश्वर, पांडुरंग गाडगे, असद मौलाना, अनिल मादसवार, यांच्यासह पत्रकार, छायाचित्रकार, वृत्तपत्र विक्रेता व पत्रकार बांधव उपस्थित होते. प्रथमत: आचार्य बाळशास्री जांभेकर यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. पोलीस स्थापना दिन सप्ताह दरम्यान आलेल्या दर्पण दिनानिमित्ताने सर्व पत्रकारांना ठाण्यात बोलावून पुष्पगुछ, पेन भेट देऊन सन्मान करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड म्हणाले कि, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचा हा सामाजिक पत्रकरितेचा वसा पुढे नेण्यासाठी समाजातील तळागाळातील लोकांचे प्रश्न, उपेक्षितांचे प्रश्न पत्रकारांनी आपल्या लेखणीतून मांडणे आवश्यक आहे. आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून शहर व तालुक्याच्या विकासाला कशी चालना देता येईल. आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या चांगल्या कार्याला समाजापुढे ठेऊन त्यांच्याकडून अधिकाधिक चांगले कार्य कसे करून घेता येईल या दृष्टिने प्रयत्न होणे गरजेचे आहे.
आपल्या पत्रकारितेतून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडून समाजातील उपेक्षित लोकांना न्याय मिळवून देणे हीच दर्पणकारांना आदरांजली ठरेल असे मत कानबा पोपलवार यांनी व्यक्त केले. यावेळी पत्रकार दिलीप शिंदे, वसंत राठोड, चांदराव वानखेडे, शुद्धोधन हनवते, धम्मपाल मुनेश्वर, नागोराव शिंदे, विजय वाठोरे, अनिल भोरे, मनोज पाटील, नागेश शिंदे, दाऊ गाडगेवाड, बाबाराव जर्गेवाड, अभिषेक बक्केवाड, विष्णू जाधव, दत्ता पुपलवाड, अंगद सुरोशे, गंगाधर गायकवाड, शेख खय्यूम, परमेश्वर सूर्यवंशी, धोंडोपंत बनसोडे, सुभाष दारवंडे, अनिल नाईक, प्रभू कदम वाघिकर, लिंगोजी कदम, आदींसह अनेक पत्रकार छायाचित्रकार उपस्थित होते.