
नांदेड। थोर समाज सुधारक महात्मा फुले स्त्री शिक्षणाच्या उद्धारासाठी आपले देह झिजवल्यामुळे सावित्रीच्या लेकीत आकाश झेपावण्याचे सामर्थ्य निर्माण झाले असे प्रतिपादन शिवालय प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या पत्नी सौ संध्याताई बालाजीराव कल्याणकर यांनी केले दीपक नगर तरोडा बु. नांदेड भागातील श्री निकेतन प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यान माला व पालक मिळाव्याचे उद्घाटन उत्साहात झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सहसचिव तथा मुख्याध्यापिका डॉ.एस .एन राऊत मॅडम तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवालय प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या पत्नी सौ संध्या ताई बालाजीराव कल्याणकर आर .के .निरपणे, अॅड. डॉ. आशालता गुट्टे सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. भारती वाठोरे, श्रीमती सुमनताई भवरे ,माजी मुख्याध्यापक के आर बनसरे ,मुख्याध्यापक यशवंत थोरात , सौ माया सूर्यवंशी सौ साक्षी सावंत ,आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमास सर्वप्रथम थोर समाज सुधारक महात्मा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदी महापुरुषांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादनानंतर सतत पाच दिवस चालणाऱ्या व्याख्यानमालेचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आपण सर्व या ठिकाणी उभे आहोत महिला पालकांनी आपल्या मुलींना उच्चशिक्षित तर कराच व सुसंस्कृत बनवा हे सावित्रीबाईला अपेक्षित आहे. ही मराठी शाळा असून सुद्धा या ठिकाणी देखील विद्यार्थी इंग्रजीमध्ये भाषण करतात व विविध कला गुणदर्शन आणि उपस्थित यांचे मन जिंकतात हे गतिमान शिक्षणाचे उदाहरण म्हणता येईल असे म्हणून श्री निकेतन शाळेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवत असलेल्या उपक्रमाचे कौतुक प्रमुख पाहुणे सौ संध्याताई कल्याणकर अॅड. आशालता गुट्टे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ भारती वाठोरे यांनी आपल्या भाषणात भावी शैक्षणिक कार्य क्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी देहाची झिजवले म्हणून आज मुली महिला उच्च शिक्षित झालेल्या पाहायला मिळतात महिला पालकांनी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्या मुलीला नेहमीच शाळेत पाठवून उच्च शिक्षित करावे असे आव्हान अध्यक्ष समारोप करताना डॉ. एस .एन .राऊत यांनी केल्या. आयोजित कार्यक्रमात विद्यार्थीनी सदर सादर केलेल्या विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम उपस्थित त्यांना मंत्रमुग्ध केल्यामुळे पालकांची एकच गर्दी झाली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका सौ कांचन सोनकांबळे ,सौ कांचन घोटकेकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार शिक्षक श्री प्रल्हाद आयनले यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
