नांदेडराजकिय

स.तेजिंदर सिंघ महेंद्र सिंघ ढाकणीवाले (पैदल ) यांची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या नांदेड शहर (जिल्हा) संघटक पदी नियुक्ती

नांदेड| राष्ट्रवादी युवक काँग्रेस (अजितदादा पवार गट) च्या शहर (जिल्हा) संघटक पदी स. तेजिंदर सिंघ महेंद्र सिंघ (पैदल ) ढाकणीवाले यांची नियुक्ती केली आहे. सदर नियुक्ती ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे नांदेड शहरअध्यक्ष श्री. मोहसीन खान पठाण व कार्याध्यक्ष श्री. माधव पाटील चिंचाळकर यांनी केली आहे.

स. तेजिंदर सिंघ हे राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्ये वर्ष 2012 पासून कार्य करत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्ये यांना नांदेड दक्षिण विधानसभा उपाध्यक्ष, शहर सरचिटणीस, शहर सचिव, शहर उपाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य अश्या अनेक पदावर कार्य केले व पक्ष संघटन, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, सामाजिक कार्य अश्या अनेक कार्य केले, त्यांचे हे कार्य लक्षात घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेस (अजितदादा पवार गट) नांदेड च्या शहर (जिल्हा) संघटक पदी त्यांची नियुक्ती केली आहे.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष श्री. सुनील तटकरे साहेब, युवक प्रदेशाध्यक्ष श्री. सुरजदादा चव्हाण साहेब, शहराध्यक्ष मोहसीन खान पठाण व कार्याध्यक्ष माधव पाटील चिंचाळकर यांचे तेजिंदर सिंघ यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!