हिमायतनगर शहरात अयोध्येतील श्री राम मूर्ती व प्रतिष्ठापना जागेच पूजन केलेल्या अक्षत कलशाची भव्य मिरवणूक संपन्न

भव्य मिरवणुकीत शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
3 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

हिमायतनगर,अनिल मादसवार | अयोध्या नगरीत प्रभू श्रीराम मंदिरात बाल मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे, त्यानिमित्ताने हिमायतनगर शहरात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने श्रीरामाची भव्य प्रतिमा आणि प्रत्यक्ष अयोध्या येथुन आलेल्या पुजीत अक्षत कलशाची भव्य शोभायात्रा फटाक्यांची आतिषबाजी व जय श्रीराम’ नामाचा जयघोष करत काढण्यात आली.

श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र अयोध्या पूजित अक्षत कलशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली, ‘जय श्रीराम’ नामाचा जयघोष अशा आनंद आणि उत्साहपूर्ण वातावरणात अयोध्येतील रामलल्लांची मूर्ती असलेल्या मंदिराच्या गर्भगृहात पूजन करून आलेल्या अक्षतांची मंगल कलश यात्रा हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिरापासून सकाळी 10 वाजता टाळ मृदंग गजरात व महिला पुरुष भजनी मंडळींच्या सानिध्यात शेकडो महिला मंडळींनी डोक्यावर कलश घेऊन भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. 

सुरुवातीला श्री परमेश्वर मंदिरापुढे श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महावीरचंद श्रीश्रीमाळ यांच्याहस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर शहरातील मुख्य रस्त्याने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यात सर्वात पुढे डोक्यावर कलश घेऊन महिला, त्यामागे भजनी मंडळ त्यामागे प्रभु श्रीरामचंद्र यांची प्रतिमा असलेला रथ अशी कलश यात्रा निघाली. अक्षदा कलश यात्रा येताच ठिकठिकाणी भाविकांनी दर्शन घेतले. शहरातील मुख्य रस्त्याने निघालेली शोभा यात्रा सराफ लाईन, बजरंग चौक, पोलीस ठाणे, लाकडोबा चौक परत श्री परमेश्वर मंदिरात आल्यानंतर येथे महाआरती करून समारोप करण्यात आला. यानंतर शहरातील व ग्रामीण भागातील घराघरात अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या निमंत्रण अक्षदा प्रतिमेसह पोचविल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

यावेळी वैष्णव हिंदू परिषदेच्या वतीने संयोजकांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि, दि. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथे आराध्य दैवत प्रभु श्रीरामजी यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हा कार्यक्रम केवळ भारतभर नव्हे तर संपुर्ण विश्वात मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे. या अभियानाची सुरूवात माझे गाव, माझी अयोध्या या संकल्पनेतुन करायची आहे. या अभुतपुर्व सोहळ्यामध्ये सर्व सामाजिक संघटना, गणेश उत्सव मंडळ, दुर्गा उत्सव मंडळ, भागवतकार, प्रवचनकार व संत मंडळी व सर्व श्रीराम भक्तांनी तसेच सर्व समाजाने न-भुतो न भविष्यती अश्या अभुतपूर्व सोहळयास सहभागी होवून सामाजिक समरसतेचा संदेश द्यावा असे आवाहन करण्यात आले.

या शोभयात्रेत श्री परमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, विहिपचे श्याम रायेवार, भाजपचे जिल्हा सरचिटणीस गजानन तुपतेवार, आशिष सकवान, बजरंग दल तालुकाध्यक्ष सोपान कोळगिर, ज्ञानेश्वर लीगमपल्ले, शिवम गाजेवार, निक्कू ठाकूर, भाजप तालुकाध्यक्ष गजानन चायल, गजानन मांगुळकर, विलास वानखेडे, ओंकार चार्लेवार, निलेश चटणे, श्री गुंडेवार, सुधाकर चिट्टेवार, शुभम नरवाडे, वैभव डांगे, अक्षय राहुलवाड, अजय बेदरकर, परमेश्वर नागेवाड, आकाश बास्टेवाड, विष्णू वानखेडे, बंडू अनगुलवार, शुभम जक्कलवाड, गजानन मुत्तलवाड, प्रीतम पिंपळे, देवा चर्लेवार, लक्ष्मण ढोणे, गजानन हरडपकर, मंगेश धुमाळे, उषा देशपांडे, सुनंदा दासेवार, ज्योतीताई हरडपकर, संगीता साखरकर, ज्योतीताई बेदरकर, आदींसह विश्व् हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते व महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणूक शांततेत पार पडावी म्हणून पोलीस निरीक्षक बी डी भुसनूर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!