भोकर| आदिवासी जातींच्या लाभाच्या योजनांची माहिती व योजनांचा लाभ सर्व तळागाळातील आदिवासींना घेता यावा यासाठीभोकर हे मध्यवर्ती ठीकाण असल्याने आदिवासी प्रकल्प कार्यालय भोकर येथे करण्याची मागणी हिंगोलीचे माजी आ. डॉ . संतोष टारपे यांनी बिरसा मुंडा जयंती सोहळ्याचे उद्घाटन करून उपस्थिताना मार्गदर्शन करताना केली .
क्रांतीसुर्य बिरसा मुंडा जयंती निमित्त गुरुवार दि .२८ रोजी सकाळी बिरसा मुंडा चौक येथे ध्वजारोहण करून लेझीम पथक , आदिवासी पारंपारीक ढेमसा नृत्या , यासह ढोलताशाच्या गजरात क्रांती सुर्य बिरसा मुंडा यांच्या तैलचित्राची भव्या मिरवणूक काढण्यात आली . माऊली मंगल कार्यालय येथे प्रा . डॉ . कमल फोले यांच्या अध्यक्षेतेत जाहिर सभा घेण्यात आली . यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अध्यक्ष आदिवासी कॉंग्रेस विभाग डॉ. अशोक माझळकर , बाजार समिती संचालक कृष्णा वागदकर , मा .संचालक शांताबाई कोळगावकर , काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते पुंडलीक वागदकर , मा . सभापती गोविंद पाटील गौड , शिवाजी देवतुळे , बालाजी शिन्दे , चंपतकाका मेंडके , धोंडीबा भिसे , जयवंत खुपसे, पांडूरंग वागदकर यांची उपस्थिती होती प्रथम बिरसा मुंडा , छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा फुले , सावित्रीमाई फुले , डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे दिप प्रज्वलीत करून पुजन करण्यात आले .
पुढे बोलतांना डॉ . संतोष टारपे म्हणाले किनवट येथील आदिवासी प्रकल्प कार्यालय हे अतिलांब असल्याने हदगाव , हिमायतनगर , भोकर तालुक्यातील आदिवासीसाठी गैरसोईचे होत असल्याने या तालुक्यातील जनतेसाठी मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शासनाने भोकर येथे आदिवासी प्रकल्प कार्यालय करण्याची मागणी केली . यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून वैद्यकिय अधिकारी डॉ .हानमंत रिठ्ठे यांनी भविष्यात आरक्षण टिकुन रहाण्यासाठी संविधानाचे रक्षण करण्याचे आवाहन केले . डॉ . बळीराम भुरके यांनी समाजातील मुलामुलींनी शिक्षणाच्या प्रवाहात राहून प्रगती साधन्याचे सांगगितले तर प्रशासकीय अधिकारी शंकर बरगे यांनी शासकीय योजनाची माहिती सांगीतली यावेळी गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला , मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले याचा गरजू रुग्णानी लाभ घेतला . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शेषराव हुरदुके तर आभार पाडूरंग गामोड कोळगावकर यांनी मानले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ उत्तम वागदकर , डॉ . रवि वाळके , डॉ माधव . भुरके ,दामेश्वर माझळकर , संजय धनवे , राजू बुलबुले, पुंजाराम डोखळे , ॲड. प्रकाश मेंडके , परमेश्वर वागदकर , रंगराव वागदकर , मारोती खुपसे , बालाजी डोखळे , संतोष वाकोडे गजानन वागदकर आदिनी परिश्रम घेतले . सभेस आदिवासी बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते .