फिरत्या वाहनावरील दुकानासाठी दिव्यांगांना अर्ज करण्याचे आवाहन

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
2 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!
Calling for applications from persons with disabilities for mobile shop

नांदेड| महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाकडून राबविण्यात येणारी दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देण्याची योजना आहे. या योजनेचा लाभ राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदारांना नावनोंदणी (अर्ज) करण्यासाठी नुकतेच पोर्टल सुरू करण्यात आले आहे.

दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी ttps://evehicleform.mshfdc.co.in ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. या लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी दि. 4 जानेवारी 2024 रोजी स. 10 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देण्याबाबतची योजना लागू करण्यासंदर्भात 10 जून 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या. यांच्या स्तरावरून सुरू आहे. या योजनेचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे. दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे. सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार/कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हा आहे.

जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 साठी राज्य व जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागाचे आवाहन
सन 2024 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेकरीता इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांनी https://kaushalya.mahaswayam.gov.in या लिंकवर भेट देऊन 7 जानेवारी 2024 पर्यंत जास्तीत जास्त नाव नोंदणी करावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त यांनी केले आहे.

जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी होते आणि ही जगातील सर्वात मोठी व्यवसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील 1 जानेवारी 2002 नंतर जन्म झालेल्या तरुणांकरीता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची स्पर्धा आहे. ही स्पर्धा ऑलिम्पिक खेळासारखीच आहे. याबाबत अधिक माहितीसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त कार्यालयाशी संपर्क करावा.

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!