
नवीन नांदेड। नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या प्रभाग क्रमांक १९ मधील कौठा वसाहतीतील शगुन सिटी मधील मालमत्ता धारकाकडुन थकीत व चालू वर्षाच्या मालमत्ता कर भरण्यासाठी आयोजित केलेल्या अभियानाला प्रतिसाद मिळाला, यावेळी नव्याने मालमत्ता नंबर, नाव परिवर्तन यासह मनपा संदर्भात अनेक कामे ही मालमत्ता धारकांनी करवून घेतली असून दोन लाख दहा हजार रुपये वसुली झाली आहे.
वाघाळा शहर महानगर पालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त महसुल डॉ. पंजाबराव खानसोळे यांच्या आदेशानुसार सिडको क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड अंतर्गत असलेल्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक सुधीर बैस, प्रभु गिरीम,वसुली लिपीक मालु एनफळे,लिपीक बालाजी लोहगावकर, विठ्ठल अंबटवार,शाम आरकुले,सौ.आर्चना जोंधळे,यांनी १७ डिसेंबर रोजी मनपा आपल्या व्दारी अभियान अंतर्गत थकीत मालमत्ता कर व चालू वर्षे कर, यासह नवीन मालमत्ता नंबर, नाव परिवर्तन यासाठी अभियान राबविण्यात आले, यावेळी मालमत्ता थकीत कर व ईतर कामा बाबतीत मालमत्ता धारकांनी प्रतिसाद दिला असून जवळपास दोन लाख दहा हजार रुपये वसुली झाली आहे. डॉ. सिंघल यांनी या कामी विशेष सहकार्य केले.
