नांदेडलाईफस्टाईल
विश्वनाथ खोब्राजी शेळके यांचे निधन
वडगांव/ पोटा। हिमायतनगर तालुक्यातील मोरगाव येथील प्रतिष्ठित नागरिक तथा कष्टकरी बागायतदार शेतकरी विश्वनाथ खोब्राजी शेळके यांचे दिनांक 16 डिसेंबर रोजी सकाळी चार वाजता अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय 65 वर्ष होते त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे त्यांचा अंत्यविधी दुपारी अडीच वाजता मोरगाव येथे करण्यात आला. अंत्यविधीसाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. हिमायतनगर येथील वास्तल्य रुग्णालयाचे प्रसिद्ध डॉक्टर योगेश शेळके यांचे ते सख्खे चुलत बंधू आहेत. त्यांच्या निधनाने शेळके परिवार व मोरगाव गावावर मोठी शोककळा पसरली आहे.