हिमायतनगर,अनिल मादसवार| येथील भारतीय स्टेट बॅंकेकडून विशेष एक रक्कमी तडजोड म्हणून ऋण समाधान योजना २०२३ – २०२४ राबविण्यात येत आहे. सदरची योजना ही मर्यादित कालावधी पुरती असून थकीत कर्ज धारकांनी या प्रभावी योजनेत मोठ्याप्रमाणात सहभागी होऊन कर्जमुक्त होण्याच्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. असे अवाहन भारतीय स्टेट बँक हिमायतनगर शाखेचे शाखाधिकारी अमेय बर्वे यांनी केले.
खातेदारांच्या अर्थिक अडचणी विचारात घेऊन भारतीय स्टेट बँकेने ऋण समाधान योजना २०२३- २०२४ अनुत्पादक ( NPA ) कृषी कर्ज, व्यवसाय कर्ज, व्यक्तिगत कर्ज खातेदारासाठी एक रक्कमी तडजोड परत फेडी साठी कर्ज धारकांना सुवर्ण संधी या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. व तसेच या योजनेप्रमाणे थकीत कर्जात भरघोस सुट देण्यात येणार आहे.आपले खाते निल केल्यास नवीन कर्ज एक महिन्यानंतर लगेच नवीन कृषी कर्ज देण्यात येणार असून ३१ डिसेंबर पर्यंत ५% अतिरिक्त सुट ही मिळणार आहे.
सदरची योजना ही २० ऑक्टोबर २०२३ पासून सुरू झाली असून आजपर्यंत १०३ लाभधारकांनी या प्रभावी योजनेचा लाभ घेतला असल्याची माहीती पिक कर्ज वितरण अधिकारी अभय कोलगे यांनी दिली. परतफेडीच्या रक्कमेत १५% ते ७०% भरीव सुट व कायदेशीर व इतर खर्च माफ, मयत खातेदारांच्या कर्जासाठी विशेष सवलत दिली जाणार आहे. सदरची योजना राबविताना बँकेच्या अटी, शर्तीच्या अधिन राहूनच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या प्रभावी ऋण समाधान योजनेत मोठ्या संख्येने थकबाकीदार कर्ज धारकांनी कर्जात सुट, सवलत योजनेचा लाभ घ्यावा. व तसेच अधिक माहितीसाठी भारतीय स्टेट बँक हिमायतनगर शाखेशी संपर्क साधावा. असे अवाहन ही शाखा अधिकारी अमेय बर्वे, पिक कर्ज वितरण अधिकारी अभय कोलगे यांनी केले आहे.